Kirit Somaiya : "अकोल्यात 15 हजार बांगलादेशींना जन्माचे दाखले देण्याचा घोटाळा", सोमय्यांचा दावा नेमका काय?

मुंबई तक

किरीट सोमय्या यांनी अकोल्यातील एक कथित आकडेवारी समोर आणली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार अकोल्यामध्ये 15 हजारावर रोहिंग्यांना जन्माचा दाखला दिल्याचा घोटाळा घडला आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

point

अकोल्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांना मिळाला जन्माचा दाखला?

point

हजारोंची आकडेवारी जाहीर करत काय म्हणाले सोमय्या?

Kirit Somaiya Case : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांशी संबंधीत अनेक घटना राज्यात समोर आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणातही बांगलादेशी घुसखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर भाजप शिवसेनेकडूनही याबद्दल मोठी मोहीम चालवली जात असल्याचं दिसतंय. अशातच आता किरीट सोमय्या यांनी अकोल्यातील एक कथित आकडेवारी समोर आणली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार अकोल्यामध्ये 15 हजारावर रोहिंग्यांना जन्माचा दाखला दिल्याचा घोटाळा घडला आहे. 

 

हे ही वाचा >> Shirdi Robbery Video : दरोडा टाकून निघालेल्या दरोडेखोरांना नागरिकांनी दगड गोटे मारून रोखलं, थरारक VIDEO

किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांबद्दल हा खळबळजनक दावा केल्यानं आता एकच चर्चा सुरू झाली आहे. अकोला जिल्हात 15,845 बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा घडला दावा सोमय्या यांनी केला आहे. अकोला 4849, अकोट 1899, बाळापूर 1468,  मुर्तिजापूर 1070, तेल्हारा 1262, पातूर 3978, बार्शिटाकळी 1319, एवढ्या प्रमाणात बनावट कागदपत्र वापरून जन्माचा दाखला मिळवला असल्याचा सोमय्या यांचा दावा आहे. किरीट सोमय्या यांनी ही माहिती एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केली आहे. 

सैफच्या प्रकरणातही बांगलादेशी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या हल्ल्यातील आरोपीने त्याचं नाव बदलून विजय दास असं ठेवलं होतं. सात महिन्यांपूर्वी त्याने अनधिकृत नागरिक म्हणून भारतात प्रवेश करण्यासाठी नदीचा वापर केला होता. पश्चिम बंगालमध्ये सुमारे 8 वर्ष राहिल्यानंतर, मी नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला. असे बरेच अवैधपणे आधार कार्डचा वापर करून सिम मिळवतात. त्यानं वापरलेलं सिम कार्ड पश्चिम बंगालमध्ये खुकमोनी जहांगीर शेखा यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.


हे वाचलं का?

    follow whatsapp