Shirdi Robbery Video : दरोडा टाकून निघालेल्या दरोडेखोरांना नागरिकांनी दगड गोटे मारून रोखलं, थरारक VIDEO

मुंबई तक

हातात कोयता, तलवार व गावठी कट्टा असलेल्या तीन दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोनं लुटलं. पण लूटलेला हा माल घेऊन पळून जाताना दुकान मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी एका दरोडेखोराला मोटारसायकल वरून खेचलं, आरडाओरडा केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिर्डीच्या पोहेगावमध्ये रंगला थरार

point

सराफा दुकानात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर फसले

point

नागरिकांनी घेराव घालून दरोडेखोरांना रोखलं

Shirdi News : शिर्डीमध्ये काल एक थरारक घटना घडली. सराफाच्या दुकानातून लूट करुन पळून जाताना अचानक परिसरातील लोक गोळा झाले आणि दरोडेखोरांना घेरलं. दरोडेखोरांवर तुफान दगडफेक केली आणि अखेर या दरोडेखोरांना पकडलंही. दरोडेखोराला ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही थरारक घटना आहे शिर्डी पासून 15 किलोमीटरवर असलेल्या पोहेगावची.

हे ही वाचा >> समीर वानखडेंना कोर्टाकडून मोठा झटका, नवाब मलिकांबाबत केलेली 'ही' मागणी

21 जानेवारीला संध्याकाळी 5:50 वेळ होती. पोहेगावमध्ये असलेल्या व्यापारी संकुलात अचानक माळवे ज्वेलर्स नावाच्या सराफा दुकानात दरोडेखोर घुसले. हातात कोयता, तलवार व गावठी कट्टा असलेल्या तीन दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोनं लुटलं. पण लूटलेला हा माल घेऊन पळून जाताना दुकान मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी एका दरोडेखोराला मोटारसायकल वरून खेचलं, आरडाओरडा केला. यामुळे काहीतरी घडल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी पळून जाणाऱ्या दरोडेखोरांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. 

नागरिक आक्रमक झाल्यानंतरही तोंडाला रुमाल बांधलेल्या दरोडेखोराने हातातील तलवारीने जमावाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेकीत जखमी झाल्यानं दरोडेखोराला नागरिकांनी तिथेच पकडलं. तर दुसऱ्यालाही पाठलाग करुन पकडलं. मात्र एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. या झटापटी दुकान मालक माळवे व त्यांचा मुलगा जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच जमावाने  बेदम चोप दिलेल्या दोन आरोपीना पोलिसांनी शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.

हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : सैफ भिडला, हल्लेखोराला पकडलं, सुटणं अशक्य होतं, म्हणूनच... आरोपीने सगळं सांगितलं

शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने यांनी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोहेगावमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहेत. एकूणच या घटनेमुळे पोहेगावच्या बाजारपेठेत काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला होता.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp