Team India: 'आली रे आली टीम इंडिया आली', जंगी स्वागतासाठी दणक्यात तयारी!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Team India Fans at Delhi IGI Airport : टीम इंडियाचे चॅम्पियन आपल्या मायदेशी (India) परतले आहेत. पाच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर रोहित ब्रिगेड आज सकाळी 6 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. टीम इंडिया दिल्लीत दाखल होताच त्यांचे थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी चाहत्यांमधला उत्साह काही वेगळाच पाहायला मिळाला.

चाहते गेल्या पाच दिवसांपासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर टीम इंडिया आयटीसी मौर्या हॉटेलकडे रवाना झाली. हॉटेलमध्येही त्यांचं जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं. लांब पल्ल्याचा प्रवास करूनही टीम इंडिया खेळाडूंच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नव्हता. हे पाहून चाहत्यांना खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसली. यावेळी, टीम इंडियासोबत धोनीही दिसला. मुंबईत होणाऱ्या भारतीय संघाच्या व्हिक्ट्री परेडमध्येही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई Tak Impact: लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून लाच, तलाठ्यावर कारवाई!

टीम इंडिया खेळाडूंचा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेटीचा कार्यक्रम ठरला आहे. दिल्लीत मान्यवरांची भेट घेतल्यानंतर ट्रॉफीसह टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत दाखल होणार आहेत. वर्ल्ड कप विजेत्या टीमचे मुंबईत जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. तसंच मुंबईत टीमची भव्य अशी व्हिक्ट्री परेडही निघणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?, फडणवीसांची मोठी घोषणा

मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडचा मार्ग आहे. संध्याकाळी 5.00 वाजता निघणाऱ्या या व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्याच आवाहन करण्यात आलं आहे. जवळपास दोन तास ही व्हिक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका मोकळ्या बसमधून ही व्हिक्ट्री परेड काढण्यात येणार आहे.

विमानतळावर रोहित शर्माच्या हातातील T20 विश्वचषक ट्रॉफी पाहून चाहत्यांनी भारताच्या नावाचा जयघोष केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह संघातील अनेक खेळाडू ट्रॉफीसोबत दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आधीच दिल्ली विमानतळावर पोहोचले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT