TESLA Project in India : एसयुव्ही Y मॉडेलसोबत टेस्ला भारतात करणार धमाकेदार एन्ट्री, कंपनीत भरती सुरू?

मुंबई तक

अमेरिक कंपनी टेस्ला या वर्षाच्या अखेरीस भारतात आपला प्रोजेक्ट सुरू करणार आहे. एलोन मस्कची कंपनी भारतात त्यांची लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल वाय पूर्णपणे असेंबल केलेली युनिट म्हणून लाँच करणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

TESLA लवकरच भारतात आपला प्रोजेक्ट सुरू करणार

point

एसयुव्ही Y मॉडेलसह करणार भारतात एन्ट्री

point

TESLA कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू

टेस्ला आपल्या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल 'वाय'सह भारतात धमाकेदार एन्ट्री करणार आहे. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलोन मस्क यांच्यातील बैठकीत टेस्लाच्या भारतातील प्रोजेक्टवर चर्चा झाली. भारतात काम सुरू करण्यासाठी टेस्ला मुंबई आणि दिल्लीमध्ये अनेक पदांसाठी भरती करत आहे. भारतातील इलेक्ट्रिक कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

अमेरिक कंपनी टेस्ला या वर्षाच्या अखेरीस भारतात आपला प्रोजेक्ट सुरू करणार आहे. एलोन मस्कची कंपनी भारतात त्यांची लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल वाय पूर्णपणे असेंबल केलेली युनिट म्हणून लाँच करणार आहे. टेस्ला त्यांच्या महागड्या मॉडेल्ससह भारतात प्रवेश करेल आणि नंतर स्वस्त मॉडेल्स सादर करण्याची योजना आखेल अशी शक्यता आहे. 

हे ही वाचा >>Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीच्या रॅलीमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो, नेमकं चाललंय तरी काय?

टेस्ला कंपनी बर्लिन गिगाफॅक्टरीमधून पूर्णपणे असेंबल केलेलं मॉडेल Y भारतात आयात करेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही राईट ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये येणार आहे. जेणेकरून भारतात ती चालवता येईल. अलीकडेच, भारत सरकारने आयात शुल्कात बदल केला आहे, त्यामुळे 40 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 34.7 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या कारवरील कर 110 टक्क्यांवरुन 70 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे, टेस्ला मॉडेल Y ची किंमत भारतात सुमारे ₹ 60-70 लाख असू शकते.

सध्या, टेस्लाची भारतात असेंब्ली करण्याची तयारी नाही. मात्र, भविष्यात ही परिस्थिती बदलू शकते. कंपनी भारतातल्या पहिल्या शोरूमसाठी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि दिल्लीतील एरोसिटीमध्ये जागा शोधतेय अशी माहिती आहे.

हे ही वाचा >>Pune Crime : कोयते दाखवून दहशत पसवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धींड

टेस्लाने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. भारतात कामकाज सुरू करण्यासाठी टेस्ला मुंबई आणि दिल्लीमध्ये अनेक पदांसाठी भरती करत आहे. कंपनीने बिझनेस ऑपरेशन अॅनालिस्ट, सर्व्हिस टेक्निशियन आणि कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर सारख्या पदांसाठी रिक्त जागा (टेस्ला व्हेकन्सी) जाहीर केल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp