ब्रेकअप झालं? निराश होऊ नका… सरकार करणार तरुणांना मदत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जर कोणाचं पार्टनरसोबत ब्रेकअप झालं असेल तर त्यांना आता निराश होण्याची गरज नाही. कारण न्यूझीलंडचे सरकार (New Zealand government) अशा तरुण-तरुणींच्या पाठीशी उभं राहणार आहे. 16 ते 24 वयोगटातील तरुणांना ब्रेकअपमधून सावरण्यासाठी आणि त्यांना नैराश्यात जाण्यापासून रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला सरकारने पाठिंबा दिला आहे. यासोबतच यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. (If someone has broken up with their partner, there is no need to despair. Because the New Zealand government will stand by such young people.)

ADVERTISEMENT

खरंतरं, ब्रेकअपनंतर अनेक प्रकरणांमध्ये गंभीर परिणाम दिसून येतात. तरुण-तरुणी चुकीची पावलं उचलतात. अशा परिस्थितीत न्यूझीलंडमध्ये ‘लव्ह बेटर कॅम्पेन’ सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून ब्रेकअपमुळे तरुणांना डिप्रेशनमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये महिला मंत्री प्रियांका राधाकृष्णन यांच्या मदतीने ही मोहिम मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.

या मोहिमेसाठी, त्यांच्या सामाजिक विकास आणि रोजगार मंत्रालयाने 30 कोटींहून अधिकच्या बजेटची तरतुद केली आहे. राधाकृष्णन यांनी एका निवेदनात म्हटले की, 1,200 हून अधिक तरुणांनी आम्हाला सांगितलं की ब्रेकअपच्या सुरुवातीच्या अनुभवांना सामोरं जाण्यासाठी त्यांना समर्थनाची आवश्यकता आहे. तरुणांनी ब्रेकअपला एक सामान्य आव्हान म्हणून ओळखले आहे.

हे वाचलं का?

तरुणांना दिले जात आहे प्रशिक्षण :

या अभियानांतर्गत ब्रेकअप झाल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तरुणांनी सामोरं जावं आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नये, म्हणून तरुण पिढीला प्रशिक्षण दिलं जात आहे. याशिवाय तरुणांना कुटुंबातील जबाबदार सदस्य बनण्याचही प्रशिक्षणही दिलं जात आहे, जेणेकरून ते कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचारात अडकू नयेत.

2022 मध्ये एका संशोधन अहवालानंतर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालात असे सांगण्यात आले की 16 ते 24 वयोगटातील सुमारे 87% न्यूझीलंड तरुणांचे ब्रेकअप झाले होते आणि त्यानंतर डिप्रेशनमध्ये आल्यानंतर बहुतेकांनी चुकीचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर युथलाइन संस्थेने ‘लव्ह बेटर कॅम्पेन’ सुरू केले. मेसेज, कॉल किंवा ईमेलद्वारे तरुण पुरुष किंवा महिला या मोहिमेत सामील होऊ शकतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT