Walmik Karad SIT Custody : संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप, SIT ला मिळाला वाल्मिकचा ताबा

मुंबई तक

वाल्मिकचा ताबा घेण्यासाठी SIT ने कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यामुळे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या वाल्मिकला आता SIT ताब्यात घेणार आहे. SIT कडून वाल्मिकवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडवर मकोका, पाय खोलात

point

हत्येचा कट रचल्याही वाल्मिकवर आरोप

point

SIT ला मिळाला वाल्मिक कराडचा ताबा

बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडवर आत मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप SIT कडून ठेवण्यात आला आहे. वाल्मिक कराडला आज न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, खून प्रकरणात मात्र त्याचा SIT ताबा घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट आहे. 

हे ही वाचा >> Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, परळीत बंद; सुरेश धस, जरांगेंचे फोटो फाडत राडा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आता SIT ने सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. या हत्या प्रकरणात SIT ने आरोपी वाल्मिक कराड याला मकोका (MCOCA) लावला आहे. यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी SIT ने अर्ज केला होता, तो ताबा आता SIT ला मिळाला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp