संजय दत्त, सलमान खान आणि आता आर्यन: कोण आहेत वकील सतीश मानेशिंदे, ज्यांना बॉलिवूडकरांची पसंती?
मुंबई: 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त असो की काल-परवाचं रिया चक्रवर्ती प्रकरण या सगळ्यात एक गोष्ट समान होती. ती म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारांची बाजू मांडणारे वकील. होय… बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना काही वेळेस कायदेशीर बाबींना तोंड द्यावं लागलं आहे. अशावेळी त्यांची बाजू हे ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे हे मांडत आले आहेत. सतीश मानेशिंदेंचं बोट धरूनच […]
ADVERTISEMENT
मुंबई: 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त असो की काल-परवाचं रिया चक्रवर्ती प्रकरण या सगळ्यात एक गोष्ट समान होती. ती म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारांची बाजू मांडणारे वकील. होय… बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना काही वेळेस कायदेशीर बाबींना तोंड द्यावं लागलं आहे. अशावेळी त्यांची बाजू हे ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे हे मांडत आले आहेत.
ADVERTISEMENT
सतीश मानेशिंदेंचं बोट धरूनच मुंबईचं पेजथ्री विश्व कोर्टाची पायरी चढतं. शाहरूखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. याच प्रकरणात शाहरूखने देखील सतिश मानेशिंदे यांनाच आपल्या मुलाची बाजू कोर्टात मांडण्यासाठी वकील म्हणून नेमलं. त्यामुळे कोण आहेत हे सेलिब्रिटी वकील सतीश मानेशिंदे आणि ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटींमध्ये एवढे फेमस का आहेत, तेच आपण आता जाणून घेऊयात.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. एनसीबीनं त्याला अटक केली आहे. शाहरूखने आपल्या मुलाची बाजू मांडण्यासाठी सतिश मानेशिंदे यांना नेमलं आहे. मानेशिंदे किला कोर्टासमोर आर्यनची बाजू मांडणार आहेत. त्यांनी या आधीही वेळोवेळी सेलिब्रेटींची बाजू मांडली आहे.
हे वाचलं का?
56 वर्षांचे सतीश मानेशिंदे हे मूळचे धारवाडचे आहेत. त्यांनी मुंबईतच वकिलीचं शिक्षण घेतलं आणि इथेच वकिली सुरू केली. सतिश मानेशिंदे हे नाव हाय प्रोफाईल, सेलिब्रिटी प्रकरणांसाठी काही नवं नाही. त्यांनी याआधीही बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सची बाजू मांडली आहे. पण त्यांच्या करिअरला खरी कलाटणी मिळाली ती संजय दत्त प्रकरणामुळे.
ADVERTISEMENT
1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आपला युक्तीवाद मांडण्यासाठी संजय दत्तनं एक वकिलांची मोठी फौज मदतीला घेतली होती. या वकिलांच्या फौजेत सतिश मानेशिंदेही होते. अतिगंभीर आरोप असतानाही मानेशिंदे यांनी संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता. त्यानंतरच हायप्रोफाईल प्रकरणात हमखास न्याय मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणून सेलिब्रिट लोक मानेशिंदेंकडे येऊ लागले.
ADVERTISEMENT
2002 मध्ये मद्यसेवन करून गाडी चालवल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मानेशिंदेच वकील होते. आणि त्यांनी सलमानला जामीनही मिळवून दिला होता.
अगदी अलीकडचं प्रकरण घ्यायचं झालं तर ते रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचं नाव घेता येईल. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर या दोघांनाही ड्रग्स प्रकरणात एनसीबीनं अटक केली होती. या दोघांची बाजू मांडली मानेशिंदे यांनी आणि दोघांनाही जामीन मंजूर झाला.
सतीश मानेशिंदे पालघर प्रकरणातही विशेष सरकारी वकील आहेत. आता मुद्दा येतो, सतीश मानेशिंदेंच्या या हायप्रोफाईल एंट्रीचं राज काय? हायप्रोफाईल प्रकरणं हाताळण्यासाठी तुमच्याकडे तसा अक्सेसही हवा. तुमच्याकडे तसे कॉन्टॅक्टस हवेत. म्हणजे तुम्ही दिग्गज वकिलाकडे काम केलं तर तिथे तुम्हाला मोठमोठी प्रकरणं मिळू शकतात.
सतिश मानेशिंदेंनाही असंच मार्गदर्शन मिळालं. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1983 साली आपल्या कारकीर्दीला सुरवात केली. त्यांनी जवळपास 10 वर्षे जेठमलानी यांच्यासोबत काम केलं. याच काळात त्यांनी फौजदारी कायद्याचा प्रचंड अभ्यास केला. नेते, अभिनेते आणि इतर बड्या मंडळींची प्रकरणं त्यांनी हाताळली.
सेलिब्रिटी वकील असलेल्या सतीश मानेशिंदे यांची फी देखील तेवढीच तगडी आहे. बॉलिवूड लाईफच्या एका रिपोर्टनुसार, मानेशिंदे एखादी केस लढत असतील, तर त्यासाठी दिवसाला 10 लाख रुपये शुल्क आकारतात. एवढी दणकावून फी घेत मानेशिंदे सेलिब्रिटी लोकांना न्याय मिळवून देतात.
NCB च्या चौकशीत मोठा खुलासा, आर्यन खान 4 वर्षांपासून करत होता ड्रग्सचं सेवन
यामुळेच आता देखील बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने आपल्या मुलाच्या बचावासाठी सतीश मानेशिंदे यांना आपलं वकील म्हणून नेमलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT