2024 लोकसभा निवडणूक: BJP-शिंदेंसाठी धोक्याची घंटा, मविआ मारणार मोठी मुसंडी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आतापासूनच कंबर कसली आहे. मात्र, या आगामी निवडणुकीत महाराष्ट्र हे भाजप आणि मोदींसाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य ठरणार आहे. खासदारांच्या दृष्टीने देशात दुसरं मोठं राज्य हे महाराष्ट्रच (Maharashtra) आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेमका कौल हा लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचबाबत सकाळ माध्यम समूहाने नुकताच एक सर्व्हे केला आहे. हाच सर्व्हे भाजपसाठी धोक्याची घंटा देणारा असल्याचं सध्या दिसत आहे. (2024 lok sabha elections threat event for bjp shinde mva will hit a big blow)

ADVERTISEMENT

साधारण वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, यावेळी झालेल्या एकूण राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे ढवळून निघालं आहे आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील मतदारांवर झाला आहे. यामुळेच नुकत्याच झालेल्या सर्व्हेतील महाराष्ट्रातील जनतेची मतं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सर्व्हेनुसार राज्यातील जनतेने नेमका काय कौल दिलाय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

सर्व्हेतील महत्त्वाचे मुद्दे:

2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष निवडून येईल?

जर लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी अभेद्य राहिली आणि जागांबाबत योग्य बोलणी पार पडली तर त्याचा थेट फायदा हा मविआला होऊ शकतो. कारण या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा महाविकास आघाडी भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या पुढे जाताना दिसत आहे.

हे वाचलं का?

सर्व्हेनुसार मविआला एकूण 47.7 टक्के एवढं मतं मिळू शकतात. ज्यामध्ये काँग्रेसला 19.9 टक्के, राष्ट्रवादीला 15.3 टक्के आणि शिवसेना (ठाकरे गट) 12.5 टक्के मिळतील. म्हणजेच राज्यातील जनतेची मविआला पसंती असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या टक्केवारीची बेरीज केल्यास ती फक्त 39.3 टक्के एवढीच दिसून येत आहे.

ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात कमी म्हणजे 5.5 टक्के लोक पसंती देत आहेत. तर भाजपला 33.8 टक्के लोकांची पसंती आहे. याशिवाय वंचित आघाडी 2.9 टक्के पसंती आहे. तर शेकाप 0.7 टक्के पसंती आहे. त्यामुळे जवळजवळ ही तीन टक्के मतंही महत्त्वाची ठरणार आहेत.

ADVERTISEMENT

पुन्हा मोदी पंतप्रधान व्हावेत?

ADVERTISEMENT

2014 आणि 2019 साली झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी लाट पाहायला मिळाली होती. पण 2024 लोकसभा निवडणूक मोदींसाठी अधिक आव्हान देणारी ठरू शकते. कारण सर्व्हेनुसार मोदींना कमी पसंती मिळत असल्याचं दिसतं आहे. मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं का? या प्रश्नाला सर्वाधिक 42.1 टक्के लोकांनी स्पष्टपणे नाही असं सांगितलं आहे. तर 42 टक्के लोकांनी पुन्हा मोदींनीच पंतप्रधान व्हावं असं म्हटलं आहे. तर 16.4 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं आहे.

 

 

 

 

पंतप्रधान पदासाठी विरोधकांमधून कोणाला सर्वाधिक पसंती?

मोदींच्या विरोधात विरोधक पंतप्रधान म्हणून कोणाला प्रोजेक्ट करणार यावरून सध्या तर्कवितर्क लढवणं सुरू असलं तरीही सर्व्हेनुसार सर्वाधिक म्हणजे 34.9 टक्के लोकांची पसंती ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाच आहे.

त्यापाठोपाठ आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 12 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर ममता बॅनर्जी यांना 4.5 टक्के, नितीश कुमार यांना 4.1 टक्के, केसीआर यांना 2.9 टक्के पसंती मिळाली आहे. तर 16.7 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं आहे.

 

विरोधकांच्या कोणत्या आरोपात तथ्य?

मोदी सरकार आपल्या विरोधकांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून विरोधकांवर दबाव आणत आहेत असं वारंवार म्हटलं जात आहे. याच मुद्द्यावर सर्व्हेत 9 टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे.

 

तर याशिवाय भाजप सरकारने धार्मिक तेढ वाढवला असं 9.7 टक्के लोकांना वाटतंय तर 5 टक्के लोकांच्या मते भाजप सरकारमुळे जातीय तणाव वाढला आहे.

 

या सगळ्यात विरोधकांना जो महत्त्वाचा आरोप केला आहे की, बेरोजगारी वाढली आहे. त्यामध्ये तथ्य असल्याचं सर्व्हेत मतं व्यक्त करणाऱ्या लोकांना वाटतं आहे. 14.2 टक्के लोकांना वाटतं की, भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. तर 4.1 टक्के लोकांच्या मते अर्थव्यवस्था ही अडचणीत आल्याचा विरोधकांचा आरोपही योग्य आहे.

आता या सर्व्हेतील आकडेवारीवर भाजप आणि मविआ आता नेमकं कसं पाहणार आणि आपली संपूर्ण रणनीती कशी आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT