Bacchu Kadu : “भाजपने वापरुन घेण्याची भाषा करू नये, नाहीतर गेम करू”, कडूंनी आवाज वाढवला
MLA Bacchu Kadu: आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या मतदारसंघानुसार सध्या भाजपचे मेळावे सुरु आहेत. त्याच धर्तीवर अमरावतीतही भाजपची (BJP Meeting) बैठक आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेला (Prahar Sanghtna) निमंत्रणही मिळाले आहे. मात्र प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी मात्र भाजपच्या या बैठकीकडे जाणार नसल्याचे सांगत आमची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले आहे. आम्ही […]
ADVERTISEMENT
MLA Bacchu Kadu: आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या मतदारसंघानुसार सध्या भाजपचे मेळावे सुरु आहेत. त्याच धर्तीवर अमरावतीतही भाजपची (BJP Meeting) बैठक आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेला (Prahar Sanghtna) निमंत्रणही मिळाले आहे. मात्र प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी मात्र भाजपच्या या बैठकीकडे जाणार नसल्याचे सांगत आमची भूमिका तटस्थ असल्याचे सांगितले आहे.
ADVERTISEMENT
आम्ही नाही जाणार…
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधत सांगितले की, ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि जिल्ह्यात संघटना असूनही कोणत्या समितीवर आमचे सदस्य घेतले गेले नाहीत. त्यामुळे या बैठकीला मी जाणार नसून आमचा प्रतिनिधी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा >> इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात, तब्बल 4 वर्ष शिक्षिकेवर बलात्कार
निधी का नाही
आमदार बच्चू कडू यांनी यावेळी भाजपच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, सध्या दोन नगरपंचायतीवर प्रहारची सत्ता आहे. मात्र त्या एकाही नगरपंचायतीला आणि सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींनाही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे आता आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
आमचा सदस्य कुठेच नाही
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटना आहे. मात्र कोणत्याही जिल्हा नियोजन समितीवर आणि संजय गांधी निराधार योजनेवरही आमचे सदस्य घेतले गेले नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसात असे निर्णय घ्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, भाजपने आता विधानसभेबाबत काय निर्णय घेणार याबाबत स्पष्टपणे सांगितले पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमचं टार्गेट विधानसभा
बच्चू कडू म्हणाले की, भाजपला जेवढी लोकसभा महत्वाची आहे, तेवढीच आम्हाला विधानसभाही महत्वाची आहे. त्यामुळे भाजपने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. त्यामुळे भाजपने लोकसभेचं टार्गेट ठरवलं असलं तरी सध्या आमच्यासमोर विधानसभेचं चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमची भूमिका ही तटस्थ असणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी हे ही म्हटले आहे की, यावेळी तटस्थ आहे म्हणजे आम्ही वाट पाहू, वेटिंग करू आणि नाही झालं तर गेम करू असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ram Mandir : ‘मी इथे शहीद झालो तर राम मंदिराचा…’, आडवाणींचा ‘तो’ किस्सा काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT