आढळराव पाटील अजितदादांसोबत जाणार? अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी हालचाली
शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील सुरूवातीलाच मी शिंदे गटासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत अजित पवार गटासोबत जाणार असल्याची अफवा असल्याचेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
Ajit Pawar vs Amol Kolhe, Shivaji Adhalrao Patil : स्मिता शिंदे,जुन्नर : पाच वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं नाही. त्याला निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान केले. पण आता शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते आणि उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचा खासदार अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) पाडण्याचे चँलेज घेतले होते. अजितदादांच्या या विधानाला कोल्हेंचे प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी समर्थन दिले होते. या समर्थनानंतर अमोल कोल्हेंना शिरूरमधून पाडण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील अजितदादांना साथ देणार असल्याची चर्चा रंगली होती. आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सूरू आहे. या चर्चांवर आता शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. (ajit pawar challenge to amol kolhe over shirur shivaji adhalrao patil reaction maharashtra politics)
ADVERTISEMENT
शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील सुरूवातीलाच मी शिंदे गटासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत अजित पवार गटासोबत जाणार असल्याची अफवा असल्याचेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच माझी वाकडी चर्चा करुन माझं राजकिय कारकिर्द संपवुन नका असे आवाहन सुद्धा आढळराव यांनी यावेळी केले आहे.
हे ही वाचा : ‘अजित पवार चार महिन्यात तुरुंगात जाणार’, शालिनीताईंनी थेट दावाच केला
दरम्यान उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचा खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचे चँलेज घेतले होते. या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी उडी घेतली होती.अजित दादांनी केलेलं विधान योग्यच असून कोल्हे पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाहीत.मात्र आता निवडणूक आल्यावर आक्रोश यात्रा सुचतेय. पाच वर्षात जनता आक्रोश करत असताना यांना दिसले नाही, असा हल्लाही आढळराव पाटलांनी कोल्हेंवर केला.
हे वाचलं का?
यासोबत राहिला विषय अजित दादांचा, दादांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती ते करून दाखवतात हे सर्वांना माहितीय.मी कोणत्या गटाकडून निवडणूक लढणार अद्याप हे ठरायचं असून मी सुद्धा या जागेवर इच्छुक असल्याचा दावा देखील आढळराव पाटील यांनी यावेळी केला आहे.
हे ही वाचा : ‘आधी चॉकलेट दिलं, नंतर…’, अल्पवयीन मुलीबरोबर घडले भयंकर कृत्य
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT