Ajit Pawar: ‘…तर, मी राजकारण सोडतो’, शरद पवारांना अजित पवारांचं चॅलेंज
Ajit Pawar Sharad Pawar News : अजित पवारांनी कोल्हापुरातील सभेत शरद पवारांवर नाव न घेता टीका केली. अजित पवारांनी शरद पवारांना थेट राजकारणातून निवृत्त होण्याचं आव्हान दिले.
ADVERTISEMENT

Ajit Pawar Sharad Pawar NCP Dispute : राष्ट्रवादी फुटली असली, तर शरद पवार ही फूट मानत नाही. दुसरीकडे अजित पवारांसह त्यांचा गट शरद पवारांवर नाव न घेता शाब्दिक हल्ले करतोय. त्यातच आता अजित पवारांनी चॅलेंज दिलंय, तेही शरद पवारांना. अजित पवारांनी थेट राजकारणातून निवृत्त होईन, असा इशारा दिलाय.
शरद पवारांची कोल्हापुरात स्वाभिमान सभा झाली. या सभेनंतर अजित पवारांची प्रत्युत्तर सभा झाली. याच सभेत अजित पवारांनी शरद पवारांना नाव घेता चॅलेंज दिलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी 5 जुलैच्या बैठकीत शरद पवारांनी सातत्याने भाजपसोबत चर्चा केल्या. उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं, तेव्हाही शरद पवारांना आमदारांनी पत्र दिलं होतं, असं ते म्हणालेले. याच घटनेचा पुनरुच्चार करत अजित पवारांनी शरद पवारांना आव्हान दिलंय.
हेही वाचा >> भयानक! 7 कामगारांचा जीव घेणारी लिफ्ट 40 व्या मजल्यावरून कशी कोसळली?
‘लोक कल्याणकारी योजना शेवटच्या माणसासाठी राबवल्या पाहिजेत. लोकहिताला प्राधान्य देणं हाच आमचा मार्ग आहे. त्याकरिता आम्ही महायुतीत सामील झालो आहोत. आमच्याबद्दल जे काही बदनामी करतात. मी आज महाराष्ट्राला सांगतो”, असं सांगून अजित पवारांनी मुद्दा काढला.
हेही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?
“खरंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्यादिवशी पडत होतं, त्याचवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केलं आणि नेत्यांना (शरद पवार) दिलं. हे खोटं असेल तर राजकारणातून निवृत्त होईन. आहे कुणाची तयारी? जर हे खरं असेल आणि जे खोटं बोलत आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे. आहे का तयारी?”, असे आव्हान अजित पवारांनी दिलं.
अजित पवार गट भाजपसोबत का गेला? छगन भुजबळांनी दिलं उत्तर
छगन भुजबळ यांनीही भाजपसोबत जाण्याबद्दल एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, युगपुरुष ज्यांनी महाराष्ट्राला विकासाचा रोडमॅप दाखवला, शरद पवार साहेब ज्यांना गुरू मानतात ते यशवंतराव चव्हाण इंदिरा काँग्रेसच्या बाहेर होते आणि परत इंदिरा काँग्रेसमध्ये गेले आणि सत्तेत सामील झाले.”
या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, युगपुरुष ज्यांनी महाराष्ट्राला विकासाचा रोडमॅप दाखवला, शरद पवार साहेब ज्यांना गुरू मानतात ते यशवंतराव चव्हाण इंदिरा काँग्रेसच्या बाहेर होते आणि परत इंदिरा काँग्रेसमध्ये गेले आणि सत्तेत सामील झाले. त्यावेळी एस. एम. जोशी यांनी त्यांना विचारलं की…
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) September 10, 2023
“त्यावेळी एस. एम. जोशी यांनी त्यांना विचारलं की चव्हाण साहेब तुम्हीसुद्धा सत्तेत सामील झालात? त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी उत्तर दिलं की, “मला सत्तेची हाव नाही. मला माझ्यासाठी सत्ता नको, पण मला माझ्या समाजासाठी सत्ता हवी आहे. आणि त्याचप्रमाणे आज आम्ही जे गेलो ते महाराष्ट्राच्या लोकांसाठी या सत्तेमध्ये सामील झालेलो आहोत, त्यांच्या विकासासाठी सामील झालो आहोत”, असं भुजबळ म्हणाले.