Ajit Pawar: फडणवीसांसमोरच अजित पवारांची संभाजी भिडेंवर टीका, म्हणाले, ‘वाचाळवीर…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar criticize sambhaji bhide parbhani shasan aplya dari program maharashtra politics
ajit pawar criticize sambhaji bhide parbhani shasan aplya dari program maharashtra politics
social share
google news

शिवप्रतिष्ठाण संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी महापूरूषांबद्दल वादग्रस्त विधान करून गरळ ओकली होती. संभाजी भिडेंच्या या विधानावरून राजकीय वर्तुळातून सडकून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. काही वाचाळवीर महापूरूषांबद्दल वेगळी वक्तव्ये करतात, त्यांनी महापूरूषांबद्दल चुकीचे वक्तव्य करू नये, असा थेट इशारावजा सल्ला अजित पवार यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता दिला आहे. (ajit pawar criticize sambhaji bhide parbhani shasan aplya dari program maharashtra politics)

ADVERTISEMENT

परभणीतून शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. याप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी संभाजी भिंडेंवर टीका केली. काही वाचाळवीर महापूरूषांबद्दल वेगळी वक्तव्ये करतात, पण हे शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे महापूरूषांबद्दल कोणीच चुकीचे वक्तव्य करण्याचे कारण नाही. ते आपले आदर्श आहेत. आणि हीच सरकारची भूमिका असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा : Vijay Wadettiwar on Ajit Pawar : ‘अजितदादा इकडेही उपमुख्यमंत्री अन् तिकडेही…’; वडेट्टीवारांचा टोला…

संभाजी भिडेंचे नेमके विधान काय?

शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना गरळ ओकली होती. “महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते.”,असे संभाजी भिडे म्हणाले होते.

संभाजी भिडे इतक्यावरच थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे”,असे विधान संभाजी भिडे यांनी 27 जुलै रोजी अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात केला होता. भिडे यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

हे ही वाचा : MNS Jagar Padyatra: अमित ठाकरे म्हणाले पुढच्या वर्षी राज ठाकरेंची सत्ता येईल, तेव्हा…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT