समर्थक आमदारच अजित पवारांवर भडकले; भेटीआधी काय घडलं? Inside Story

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

why did ajit pawar meets sharad pawar with supporters mlas?
why did ajit pawar meets sharad pawar with supporters mlas?
social share
google news

Ajit Pawar-Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळातच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही पडला आहे. कारण 2 जुलै पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने घडामोडी सुरू आहेत. अजित पवारांनी बंडांचं निशाण फडकावत स्वतंत्र चूल मांडली, मात्र त्यानंतर तीन दिवसांपासून शरद पवार-अजित पवारांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यातच आता अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांना शरद पवारांच्या भेटीला घेऊन गेले. पण, ही भेट का झाली आणि अजित पवारांना आमदारांना पवारांच्या भेटीला का घेऊन जावं लागलं, याबद्दल सुत्रांनी पडद्यामागील स्टोरी मुंबई Tak ला सांगितली. (MLA of ncp ajit pawar faction gets angry after cabinet ministers met sharad pawar)

ADVERTISEMENT

2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची, तर त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांपैकी 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानतर 5 जुलै रोजी अजित पवार गटाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह काही नेत्यांनी थेट शरद पवारांवरच हल्ला चढवला. त्यामुळे आता राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार नाही, अशी चर्चा सुरू झाली.

16 जुलैच्या भेटीमुळे आमदार चिडले

पण, आता गोंधळात टाकणारं दृश्य महाराष्ट्रात दिसत आहे. कारण गेल्या तीन-चार दिवसांत अजित पवार आणि शरद पवार यांच्या तीन बैठका झाल्या. प्रतिभा पवार यांना पाहण्यासाठी गेल्यानंतर अजित पवार, शरद पवार भेटले. त्यानंतर मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर रविवारी, 16 जुलै रोजी अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांसह आणि प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह भेट घेतली. याच भेटीमुळे अजित पवार समर्थक आमदार चिडल्याचे सुत्रांनी सांगितलं.

वाचा >> Maharashtra assembly session : राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत कुठे बसले?

शरद पवार यांच्या भेटीआधी काय घडलं?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी, 16 जुलै रोजी अजित पवारांनी फक्त मंत्र्यांसोबत शरद पवारांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. यावरूनच आमदारांनी अजित पवारांना उलट प्रश्न केला.

वाचा >> Opposition unity : UPA होणार नामशेष! भाजपविरोधात काय आहे रणनीती?

‘आम्हाला विश्वासात न घेता फक्त मंत्र्यांनाच घेऊन भेट का घेतली?’, असा सवाल आमदारांनी केला. ‘मंत्र्यांना सहानुभूती मिळेल, पण आमदारांना मतदारसंघात रोषाला सामोरे जावे लागते’, अशी भावना आमदारांनी अजित पवारांसमोर मांडली.

ADVERTISEMENT

वाचा >> Lok Sabha 2024 : भाजपचं ‘खेला होबे’! शिंदे, पवारांनंतर आणखी तीन नेते ‘एनडीए’त

अजित पवारांच्या उपस्थितीत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (17 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक विधानभवनात झाली. या बैठकीत आमदारांचा नाराजीचा सूर आळवला. आमदारांच्या रोषामुळे अजित पवार आणि प्रफुल पटेल सर्व आमदारांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेले”, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT