Ajit Pawar meets Sharad Pawar : “शरद पवारांना चोरडियांच्या घरी भेटलो, पण…”
ajit Pawar first Reaction after meeting with sharad pawar. ajit pawar said i meet to sharad pawar, but this was family meeting. sharad pawar is senior member of our family and that’s why i met him.
ADVERTISEMENT
Sharad Pawar meets Ajit Pawar update : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीने चर्चेला तोंड फुटलं. या भेटीबद्दल वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पवारांसोबत झालेल्या या भेटीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेर मौन सोडलं. (Ajit Pawar clarification on meet with sharad pawar)
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांसोबत अतुल चोरडिया यांच्या घरी झालेल्या बैठकीबद्दल विचारण्यात आले. त्यावर अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली.
वाचा >> अजित पवार माघारी फिरणार?, शरद पवारांची खळबळ उडवणारी ‘गुगली’
अजित पवार म्हणाले, “पुण्याच्या बैठकीचं मनावर घेण्याचं कारण नाही. शरद पवारांनी स्वतः सांगितलं, पवार कुटुंबातील ते ज्येष्ठ आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. घरातील व्यक्तींना भेटणं, यात कारण नसताना मीडियावाले त्याला इतक्या वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहेत. त्यातून समज-गैरसमज निर्माण होतात. त्याच्यामुळे त्या भेटीत वेगळं काही घडलं, असं समजण्याचं कारण नाही.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अजित पवारांनी वृत्त फेटाळले
याच मुद्द्यावर पवार पुढे म्हणाले की, “मी लपून गेलेलो नाही. हे जे काही चाललंय ना… मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय लपून जायचं कारण आहे. तू कुठे बघितलं मला लपून गेलेलो? (पत्रकाराला प्रश्न) मी उद्या तुमच्या घरी आलो, तर तुमच्या घरातून कधी बाहेर पडायचं तो माझा अधिकार आहे. ज्या गाडीला अपघात झाला, त्या गाडीत मी नव्हतोच, मग मी खाली कसा उतरणार?”, असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
वाचा >> ‘सामना’चा अग्रलेख शरद पवारांच्या जिव्हारी, पत्रकारावर संतापले!
“मी बैठकीला गेलो, हे मी मान्य करतो. परंतु ज्या गाडीचा अपघात झाला, ती गाडी माझी नव्हतीच. मी त्या गाडीत नव्हतो. चोरडियांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत. चोरडियांचे वडील हे शरद पवारांचे वर्गमित्र होते. शरद पवार तिकडून व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. माझा कार्यक्रम चांदणी चौकात होता”, असं अजित पवारांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
जनतेला आव्हान… अजित पवार म्हणाले…
“चोरडियांनी शरद पवार यांना जेवायला बोलावलं होतं. जयंत पाटील शरद पवारांसोबत होते. नितीन गडकरींनी एक महिन्यांपूर्वी मला कार्यक्रमाबद्दल सांगितलं होतं. त्या पुलाच्याबद्दल खूप अडचणी आल्या. परंतु त्या सगळ्या अडीअडचणी आम्ही राज्यकर्ते म्हणून आणि नितीन गडकरी केंद्रीय मंत्री म्हणून सोडवल्या. त्यामुळे त्या कार्यक्रमाला गेलो. दोन-दोन पिढ्या ओळखीच्या असलेल्या व्यक्तीने जेवायला बोलावलं, तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही. मी जनतेला सांगेन की इथून पुढे आम्ही केव्हाही भेटलो… दिवाळीत भेटलो, घरी भेटलो, दुसऱ्याच्या घरी भेटलो तर त्यातून कुठलाही अर्थ काढू नका. ती कौटुंबीक भेट असते”, असा खुलासा अजित पवारांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT