”आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्राला…”, अजित पवारांच्या शपथविधीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

'हॅलो, फडणवीसांच्या घरात बॉम्ब'; धमकीचं 'लाईट' कारण आलं समोर
'हॅलो, फडणवीसांच्या घरात बॉम्ब'; धमकीचं 'लाईट' कारण आलं समोर
social share
google news

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 9 मंत्र्यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. दरबार हॉलमध्ये हा शपथविधीचा सोहळा पार पडला. या शपथविधीनंतर राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि विकास करू अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (ajit pawar taken oath as deputy chief minister and ncp 9 mla take oath governor ramesh bais dcm devendra fadnavis first reaction)

ADVERTISEMENT

अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर दरबार हॉलबाहेर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी, असे आम्ही तिघेही मिळून विकासाचा एक नवीन अध्याय लिहू आणि एक अतिशय पुरोगामी सरकार, एक अतिशय विकास देणारे सरकार आम्ही देऊ,असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे.  त्यामुळे आता अजित पवार यांच्या रूपात महाराष्ट्राला दोन उप मुख्यमंत्री मिळाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 नेते मंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. दरम्यान हे राष्ट्रवादीचे हे 9 मंत्री कोणते असणार आहेत, हे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

  • अजित पवार – उपमुख्यमंत्री
  • छगन भुजबळ, मंत्री
  • दिलीप वळसे पाटील, मंत्री
  • हसन मुश्रीफ, मंत्री
  • धनंजय़ मुंडे, मंत्री
  • धर्मरावबाबा अत्राम, मंत्री
  • आदिती तटकरे, मंत्री
  • संजय बनसोडे, मंत्री
  • अनिल बनसोडे, मंत्री
  • अनिल पाटील, मंत्री

 

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT