Vidhansabha: ’50 खोकेंचा’ प्रश्न विचारला मुख्यमंत्री शिंदेंना, पण उत्तर दिलं अजित पवारांनी!
ठाकरेंना शिवसेना पक्षाचे 50 कोटी परत केले असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याबाबत जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा याचं उत्तर हे अजित पवारांनी पहिल्यांदा दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT
Ajit Pawar and Eknath Shinde: मुंबई: विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचं (Monsoon Session) सूप आज (4 ऑगस्ट) मुंबईत वाजलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. पण याचवेळी 50 खोकेंवरुन त्यांच्यावर जी टीका केली जाते त्यावरुन त्यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. तसंच आपणच त्यांना 50 कोटी परत केल्याचं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, अधिवेशनानंतर पत्रकारांनी जेव्हा याच प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा त्याचं उत्तर शिंदेंनी देण्याऐवजी सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (ajit pawar was the first answer on shiv sena party 50 crore rupees infront of cm eknath shinde vidhansabha )
ADVERTISEMENT
विधानसभेबाहेर पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सभागृहाबाहेर येऊन सुरुवातीला एकूणच झालेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.
प्रश्न: तुम्ही सभागृहात एक पत्र दाखवलं.. त्या पत्रात 50 कोटी परत देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. ते 50 कोटी तुम्ही त्यांना परत दिल्याचं सभागृहात म्हणाले. ते नेमकं प्रकरण काय?
हे वाचलं का?
दरम्यान, या प्रश्नानंतर खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, त्याऐवजी अजित पवारांची उत्तर द्यायला सुरुवात केली.
अजित पवार- त्यामध्ये सुभाष शिंदे साहेब.. सुभाष देसाई साहेब.. सॉरी.. आणि अनिल देसाई साहेबांचं पत्र होतं. शिवसेनेच्या लेटरपॅडवर होतं. त्यामध्ये त्यांनी चिन्हाचाही वापर केला होता वास्तविक चिन्ह आणि पक्षाची जी काही जबाबदारी आहे ते निवडणूक आयोगाने शिंदे साहेबांकडे सोपावलं आहे. पण त्या खोलात मला जायचं नाही. त्या पत्रात त्यांनी सांगितलं होतं की, मागे काही डिपॉझिट ठेवलेलं होतं. त्या डिपॉझिटचे पैसे हे आमच्याकडे वर्ग करा.
ADVERTISEMENT
‘यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे प्रमुख या नात्याने कुठलेही आढेवेढे न घेता ते पैसे तिकडे वर्ग केले.’
ADVERTISEMENT
दरम्यान, याच प्रश्नावर नंतर एकनाथ शिंदेंनी देखील सविस्तर उत्तर दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : खरं म्हणजे अजितदादांनी इथे जो मुद्दा उपस्थित केला त्याला उत्तर दिलेलं आहे.. खरं म्हणजे मुळात शिवसेना आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आणि शिवसेना पक्ष निवडणूक आयोगाने त्याबाबत आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा त्याचा वापर करून… खरं तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घामाचे आणि कष्टाचे पैसे आहेत. हे देणगीचे पैसे आहेत. त्यामुळे ते पैसे मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा एक प्रश्न निर्माण होतो..
हे ही वाचा >> मुंबई Tak चावडी: मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवारांचा विरोध होता,पण… जिंतेंद्र आव्हाडांनी सांगितली Inside Story
परंतु आमच्याकडे पत्र दिल्यानंतर यापूर्वीच जाहीर केलं होतं. की, जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला होता की, आम्ही शिवसेनेची संपत्ती आणखी काही, काही याच्यावर दावा करू.. त्यावेळेस मी सांगितलं होतं की, कोणत्याही संपत्तीवर यावर दावा करणार नाही.
बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली बरोबर की चूक हे लक्षात न घेता ते तात्काळ आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की, त्यांना शिवसेना ना बाळासाहेब ना शिवसैनिक या कुणाबाबतही प्रेम नाही. शेवटी फक्त पैशाबद्दल प्रेम आहे. ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
हो ते पैसे परत केले.. आता त्यांना आरोप करण्याचे नैतिक अधिकार नाहीत. हे पहिल्यांदा मी सांगतो.. हे मी सभागृहात देखील सांगितलं आहे.
आज 50 आमदार, 13 खासदार.. विधानपरिषदेचे आमदार उपसभापती लाखो कार्यकर्ते, हजारो नगरसेवक हे सगळे लोक जे बाळासाहेबांच्या विचाराच्या भूमिकेसोबत येत आहेत याचा अर्थ काय.. याची कारणमीमांसा केली पाहिजे, आत्मपरिक्षण केलं पाहिजे. जेवढे इकडे येत आहेत तेवढे गद्दार आहेत का? खोके घेणारे आहेत का?, किंबहुना जे आले इकडे त्यांची कचरा म्हणून गिनती केली जाते. अशा प्रकारचं शेवटी आपल्याला का सोडून जातायेत? याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे.
हे ही वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंची शेवटच्या दिवशी फटकेबाजी; उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
हयात हॉटेलमध्ये देखील एक बैठक झाली होती. त्याचं नाव मी सांगत नाही.. ते रोज त्यांच्याबरोबर असतात.. त्यांच्या जवळचे आहेत आणि ते जे-जे काही म्हणत होते तेव्हा.. मुख्यमंत्री मी नव्हतो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जे काही वक्तव्य त्यांनी केली आहेत ते मी इथे बोलू शकत नाही.. ते असंसदीय या शब्दात आहेत. अगदी खालच्या पातळीवरचं असू शकतं. परंतु मी योग्य वेळ आली.. आणू नये माझ्यावर.. तर तेही मी बोलू शकतो.. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (UBT) वर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT