Shiv Sena UBT : “फडणवीसांचा पोपट झाला, नवा मुख्यमंत्री मिळणार”; शिंदेंबद्दल मोठी भविष्यवाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

shiv sena UBT mouthpiece saamana attacks on Narendra modi and amit shah. thackeray calls devendra fadnavis as parrot
shiv sena UBT mouthpiece saamana attacks on Narendra modi and amit shah. thackeray calls devendra fadnavis as parrot
social share
google news

Maharashtra political news : “महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचाही मोदी व शाह यांच्या भाजपने केला आहे”, असा आरोप हल्ला करत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून घणाघाती टीका केली आहे. NCP Leader Ajit pawar will become new chief minister of maharashtra, claim by uddhav thackeray shiv sena.

ADVERTISEMENT

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची चर्चा सुरु होती, ते अखेर 2 जुलै रोजी घडलं. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेत अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा केला. अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या या घटनेवरून शिवसेनेने (UBT) नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्ला चढावला आहे.

हे वाचलं का?

सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह राजभवनात पोहोचतात. पाठोपाठ देवेंद्र फडणवीस लव्याजम्यासह येतात आणि पवार आठ मंत्र्यांसह शपथ घेऊन स्वतःला भाजपच्या दावणीला बांधून घेतात. अजित पवार यांच्या सरकारीकरणास काय म्हणावे?”

वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!

“पवार हे विरोधी पक्षनेता होते. विरोधी पक्षनेत्यानेच असं सरकारजमा व्हायचे, हे लोकशाहीच्या व नैतिकतेच्या कोणत्या प्रकारात बसते?”, खडा सवाल शिवसेनेने (UBT) अजित पवारांना केला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra politics : “देवेंद्र फडणवीसांचा पोपट झालाय”

पुढे सेनेने (UBT) म्हटलं आहे की, “अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे; पण यावेळी डील पक्के आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेलेले नाहीत. लवकरच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल. अजित पवारांना सिंहासनावर बसवलं जाईल. या सगळ्यात पोपट झाला आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा”, असा चिमटा सेनेने काढला आहे.

ADVERTISEMENT

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून फडणवीसांना घेरलं

“नाही, नाही. राष्ट्रवादीबरोबर कदापि जाणार नाही. तो भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे’, असे ते मान हलवत, मानेला झटके देत सांगत होते. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन भ्रष्टाचाराचा आरोप आहे व पवारांना सोडणार नाही अशी त्यांची भाषा होती. छगन भुजबळ हे तर जामिनावर आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’च्या अटकेची तलवार आहे. तेसुद्धा हंगामी जामिनावर बाहेर आहेत. तटकरे यांचाही पाय खोलात आहे. सगळ्यांची प्रगतीपुस्तके ही तपास यंत्रणांच्या शेऱ्यांनी भरलेली आहेत. या सगळ्यांनी श्रीमान फडणवीस यांच्या साक्षीने मंत्रीपदाची शपथ घेतली”, असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना घेरलं आहे.

सामना अग्रलेखात आणखी काय म्हटलंय?

– “प्रफुल्ल पटेल हेसुद्धा या सोहळ्यास उपस्थित होते. इक्बाल मिर्चाशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात त्यांची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली. आता श्री. पटेल यांची संपत्ती मोकळी होईल व ते पेंद्रीय मंत्री होतील. शरद पवार यांना कालपर्यंत जे ‘देव’ मानत होते असे बरेच भक्तगण अजित पवारांसोबत गेले.”

– “पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भोपाळच्या ऐतिहासिक भाषणात सांगितले की, ‘पाटण्यात जमलेल्या विरोधी पक्षांनी 20 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.’ त्यातले अडीच लाख कोटी आता भाजपच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे पुढच्या भाषणात मोदी यांना सुधारित आकडा सांगावा लागेल. मोदी व शहा यांना भ्रष्टाचाराचे वावडे नाही. फक्त तो भाजपात येऊन करा एवढेच त्यांचे म्हणणे आहे. याचा दुसरा अर्थ असाही होतो की, तपास यंत्रणांच्या कारवाया राजकीय दबावाखाली होतात व तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे.”

वाचा >> “शिवसेनेच्या 40 आमदारांना संधी”, बंड अजित पवारांचं, पण जयंत पाटलांचा शिंदेंना सल्ला

– “अजित पवार शेवटपर्यंत सांगत होते, ‘शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार हे स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ काय?’ फडणवीस सांगत होते, ‘राष्ट्रवादीशी कधीच युती करणार नाही.’ पण दोघांनीही पलटी मारली. त्या पलटीमागे मिंधे गटाचा घात आहे.”

– ” शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आणखी किती काळ राहतील एवढाच काय तो प्रश्न आहे. अजित पवार व त्यांचे लोक राजभवनात शपथ घेताना शिंदे टोळीचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते. राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेनेला सोडले. अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, असे अकांडतांडव करणारे आता काय करणार?”

– “ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे. एक मिंधे जातील व दुसरे येतील. महाराष्ट्राला त्यातून काय मिळाले?”

वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांनी घेतली शपथ, शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

– “शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंदय़ांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे?”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT