‘अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील’, प्रफुल पटेलांचं विधान
एकनाथ शिंदे यांना काढून अजित पवार यांना मुख्यमंत्री करणार, अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकारणात सुरू आहे. यावर प्रफुल पटेल यांनी भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
Ajit Pawar News : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. एकनाथ शिंदेंना हटवून मुख्यमंत्री अजित पवारांना करणार असल्याचे दावे विरोधक आणि राजकीय वर्तुळात केले जाताहेत. दुसरीकडे अजित पवार मात्र, याबद्दल मौन बाळगून आहेत. चर्चेत असलेल्या मुद्द्यावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी भूमिका मांडली आहे.
प्रफुल पटेल म्हणाले, “आज ती जागा रिकामी नाही मग चर्चा कशाला करतात? आज अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. आणि ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत. काही नवीन गोष्ट नाहीये आणि असं आहे की कधी ना कधी म्हणजे काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते. आणि अनेक लोकांना मिळालेली आहे. मग अजित पवारांना आज ना उद्या म्हणजे पुढच्या काळात नक्कीच संधी मिळेल आणि आम्ही देखील त्या दिशेने काम करू’, असं प्रफुल पटेल म्हणाले.
अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद? पटेल म्हणाले…
केंद्रात अजित पवार गटाला मंत्रीपद मिळणार असल्याचंही बोललं जातंय. यावर प्रफुल पटेल, “केंद्राच्या विस्ताराबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही. मला आता वाटतंही नाही की केंद्रात विस्तार किंवा फेरबदल होणार आहे. लोकांना असं वाटतं की महाराष्ट्रात सरकारमध्ये सामील झालो म्हणून केंद्रामध्ये आम्ही जातोय, पण असं कुठलाही प्रस्ताव नाही, चर्चा नाही आणि एखाद्या वेळी फेरबदलही होण्याची शक्यता नाही”, अशी माहिती प्रफुल पटेलांनी दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> ‘मार्शल बोलवून बाहेर काढावं लागेल’, गोपीचंद पडळकरांना नीलम गोऱ्हेंनी झापलं
“मी आमच्या पक्षाच्या अंतर्गत जे काही चाललेलं आहे, त्याच्याविषयी मी काहीच भाष्य करणार नाही. शरद पवार हे आमचे नेते आहेत. आमचे दैवत आहेत. आयुष्यभर राहतील म्हणून त्यांच्याविषयी आमची आस्था आहे, ती कुठेही कमी होणार नाही. एखादा राजकीय निर्णय करीत असताना आमची पण इच्छा आहे की पूर्ण पक्ष एकसंघ राहिला पाहिजे. आम्ही त्यांना विनंती करत आलो आहोत. आजही करीत आहो आणि उद्याही करू”, असं प्रफुल पटेल शरद पवारांच्या गटाला दिल्या गेलेल्या नोटिशीवर म्हणाले.
मोदींच्या ‘थर्ड टर्म’साठी…
“आमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही सगळे ताकतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत”, असं प्रफुल पटेल म्हणाले.
ADVERTISEMENT
वाचा >> Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत युती… उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला
“आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललेलं आहे म्हणजे कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचं कारण नाही. पण जे काही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे विचारधारा आणि एवढे सारे लोकांना एकत्रित अन्न आणि एक संघ आणून आणि देशाला चांगला विकल्प देणे ही काही सोपी गोष्ट नाही. देशाने अनेक वेळा असे प्रसंग अनुभवले आहे. त्यामध्ये 77, 89, 96 असे अनेक प्रसंग आले; ज्यावेळी देशात असे वातावरण निर्माण झालं होतं देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता”, असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
विरोधकांच्या आघाडीबद्दल पटेल काय म्हणाले?
“मागच्या काही दिवसांमध्ये आज जे इंडिया म्हणतात त्यांच्या मीटिंगमध्ये मला जाण्याचा एकदा प्रसंग आला होता. त्यावेळी अनेक पक्षाचे वेगवेगळे विचार आणि जी मानसिकता आहे… ज्या पद्धतीने सगळे आहेत, एकमेकांचे बाबतीत कोणी विश्वासहार्यता प्रस्थापित करू शकले नाहीत, हे देशाला कुठपर्यंत परवडणारे आहे, याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे”, अशी टीका प्रफुल पटेल यांनी केली.
ADVERTISEMENT