Ajit Pawar मुळे राष्ट्रवादीत होणार भूकंप! 34 आमदारांकडून शरद पवारांची मनधरणी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar and NCP MLAs may go with BJP, the party MLAs seems to be divided and disillusioned about the future course of political developments.
Ajit Pawar and NCP MLAs may go with BJP, the party MLAs seems to be divided and disillusioned about the future course of political developments.
social share
google news

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत असून, 30 ते 34 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. (ajit pawar will go with bjp and be part of the Shinde-Fadnavis govt, almost 30/34 MLAs supported him.)

ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे चिन्ह दिसू लागले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात 2019 ची पुनरावृत्ती होण्याच्या चर्चेनं फेर धरला असून, आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी पक्षात मोर्चेबांधणी केली आहे.

30 ते 34 आमदार अजित पवारांसोबत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपसोबत आघाडी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका अजित पवारांची आहे. त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीच्या 53 पैकी 30 ते 34 आमदारांचा पाठिंबा आहे.

हे वाचलं का?

यात राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचाही अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा आहे.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांच्या भूमिकेला विरोध

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील 34 पर्यंत आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असला, तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मात्र भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्यांना आमदाराच्या गटाने शरद पवारांची भेट घेऊन भाजपसोबत जाण्याबद्दलची इच्छा व्यक्त केली.

ADVERTISEMENT

शरद पवारांचा विरोध, पण संकेत ठरणार खरे?

राष्ट्रवादीतील आमदारांचा एक मोठा गट भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत आहे. आमदार आणि काही वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, भाजप-शिंदे सरकारमध्ये जाण्याच्या निर्णयाला पवारांनी विरोध केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maharashtra Political Crisis: ‘या’दिवशी लागणार निकाल.., शिंदे राहणार की ठाकरे येणार?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीत शरद पवारांनी राष्ट्रवादीतील आमदार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेबद्दल एक सूचक विधान केलं होतं. “कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही”, असं ते म्हणाल्याची माहिती खुद्द संजय राऊतांनीच दिली होती. त्यामुळे पवारांचे हे विधान खरे ठरण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT