Kirit Somaiya: सोमय्यांच्या ‘त्या’ कथित Video वर अखेर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

allegedly offensive video of bjp leader kirit somaiya shiv sena ubt leader sanjay raut
allegedly offensive video of bjp leader kirit somaiya shiv sena ubt leader sanjay raut
social share
google news

Maharashtra Politics News Marathi: मुंबई: भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (allegedly offensive video) समोर आल्यानंतर आता त्यांच्यावर चौफेर टीका सुरू आहे. विरोधकांनी त्यांच्या या व्हिडीओवरुन त्यांच्यासह भाजपला (BJP) टार्गेट सुरू केलं आहे. पण या सगळ्याबाबत किरीट सोमय्यांसोबत राजकीय शत्रुत्व असणारे शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे काय प्रतिक्रिया देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर संजय राऊत यांनी याबाबत अत्यंत शेलक्या शब्दात ट्वीट करत सोमय्यांचं नावही न घेता निशाणा साधला आहे. (allegedly offensive video of bjp leader kirit somaiya shiv sena ubt leader sanjay raut reaction twitter maharashtra politics news marathi)

ADVERTISEMENT

सोमय्यांचा ‘तो’ कथित Video आणि संजय राऊतांचं ट्वीट

किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. याचबाबत संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्वीट केलं असून त्यांनी याबाबत असं म्हटलं आहे की, ‘आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे”, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र!

हे ट्विट संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप महाराष्ट्र यांना टॅग केलं आहे.

राऊत विरुद्ध सोमय्या वाद

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी या सरकारमधील अनेक नेत्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सोमय्यांनी त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांकडे तक्रारी दिल्या होत्या. त्यापैकीच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्यावर देखील सोमय्यांनी पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर असे आरोप केले होते.

ADVERTISEMENT

ज्यानंतर जाहीर पत्रकार परिषदांमधून राऊत आणि सोमय्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. अनेकदा तर संजय राऊतांनी भर पत्रकार परिषदेत सोमय्यांना अपशब्द देखील वापरले होते. तर सोमय्यांनी देखील तेवढ्याच आक्रमकपणे त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Kirit Somaiya: आक्षेपार्ह Video वर सोमय्यांची 12 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. तेव्हापासून सोमय्या आणि राऊतांमधील वाद प्रचंड टोकाला पोहचला होता. मात्र, आता सोमय्यांचा प्रचंड वादग्रस्त असा व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय राऊतांनी वेगळ्याच पद्धतीने सोमय्यांवर निशाणा साधला.

भाजपविरोधात मोर्चेबांधणी, संजय राऊत बंगळुरात

दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधक हे भाजपविरोधात रणनिती आखत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्याची पहिली बैठक ही पटनामध्ये पार पडली होती. तर दुसरी बैठक ही आज (18 जुलै) बंगळुरात पार पडणार आहे. देशातील अनेक दिग्गज नेते हे या बैठकीसाठी बंगळुरात आले आहेत. शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे कालच बंगळुरात दाखल झाले आहेत.

या बैठकीत व्यस्त असल्याने संजय राऊत यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर फारसं काही भाष्य केलेलं नाही. मात्र, आता याबाबत ते उद्या पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे.

‘त्या’ Video वर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्याच्या 12 तासानंतर किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली.

‘एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे.’

हे ही वाचा >> Kirit Somaiya: ‘BJP ने सोमय्यांचा बळी दिला’, आक्षेपार्ह Video वर सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य

‘माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी देवेंद्र फडणवीस यांना विनंती.’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं.


यासोबत किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी चौकशी व्हावी असं पत्रही दिलं आहे.

आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.

अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार…. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT