‘हीच जागा योग्य होती, पण…’; अमित शाहांचं विधान ऐकून अजित पवारांनी जोडले हात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Amit shah first reaction after ajit pawar joined shiv sena bjp government.
Amit shah first reaction after ajit pawar joined shiv sena bjp government.
social share
google news

Amit Shah : उपमुख्यमंत्री बनल्यानंतर अजित पवार आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह एका मंचावर दिसले. अजित पवार यांच्या भाजपसोबत येण्याच्या निर्णयाचं शाहांनी स्वागत केले. यावेळी शाहांनी स्मित हास्य करत केलेले विधान ऐकून अजित पवारांनी हात जोडत आभार मानले. (Union home minister Amit Shah welcomed the decision of ajit pawar to join in Shiv sena bjp alliance)

ADVERTISEMENT

केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. अमित शाहांनी सहकार विभागाच्या माध्यमातून सहकार चळवळीला बळकट करण्याचा मानस व्यक्त केला.

आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच अमित शाह यांनी अजित पवार यांच्या भाजप-शिवसेना युतीत येण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. अमित शाह यांनी अजित पवारांना योग्य ठिकाणी बसला आहात, असं विधान केले.

हे वाचलं का?

वाचा >> अमित शाह पुण्यात आल्यानंतर अजित पवारांनी कसं केलं कौतुक?

शाह म्हणाले, “अजितदादा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा आले आहेत. आणि मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत कार्यक्रमामुळे एका मंचावर आलोय. मी त्यांना सांगू इच्छितो की, खूप काळानंतर तुम्ही योग्य जागी बसला आहात. हीच जागा योग्य होती, पण तुम्ही खूप वेळ लावला”, असे विधान शाहांनी केले.

वाचा >> ‘…तर तुमच्यावरच बुलडोजर चालवणार’, गडकरींनी कुणाला दिला दम?

अमित शाह यांच्या या विधानानंतर मंचावरील मान्यवरांसह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी हसून यावर प्रतिक्रिया दिली. तर अजित पवार यांनी हात जोडत त्यांचे आभार मानले.

ADVERTISEMENT

सहकाराची राजधानी महाराष्ट्र

“महाराष्ट्र देशातील सहकाराची राजधानी आहे. सहकाराचे संस्कार महाराष्ट्रातून देशात पोहोचले. नरेंद्र मोदींनी सहकारातून समृद्धीचा जो विचार मांडला आहे. मोदींनी 9 वर्षात देशातील 60 कोटी लोकांचे स्वप्न पू्ण केली. घरं, वीज, गॅस सिलिंडर, शौचालय, आरोग्याच्या सुविधा या गोष्टी मिळवण्यासाठी लोकांच्या दोन-तीन पिढ्या गेल्या. ते सारी कामं मोदींनी 9 वर्षात एका झटक्यात पूर्ण केले.”

ADVERTISEMENT

वाचा >> ‘त्यांनी घडवले ते प्रदीप कुरुलकर’, राऊतांनी RSS, फडणवीसांना काय सुनावलं?

“देशातील 60 कोटी गरीब अर्थव्यवस्थेशी जोडले गेलेले नव्हते. त्यांच्याकडे बँक खातेही नव्हते. त्यांना बँक खाते देण्याचे कामही पूर्ण केले. आता त्यांना स्वप्न पडतात की, घरात टीव्ही, मिक्सर यावा. माझी मुलं अधिकारी व्हावेत. ही स्वप्न त्याला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पडू लागली आहेत.”

महाराष्ट्रातील कारखान्यांना केलं आवाहन

“महाराष्ट्रातील एकही साखर कारखाना असा असू नये, जो ईथेनॉल बनवत नाही. एनसीडीसीजवळ खूप सारा पैसा आहे. दहा हजार कोटी घोषणा केली. ते विसरून जा. तुम्हाला जितका पैसा हवाय, तितका दिला जाईल. ईथेनॉल सयंत्र कारखान्यांनी लावायला हवेत”, असं आवाहन शाहांनी केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT