ठरलं तर! आशिष देशमुख ‘या’ दिवशी करणार भाजपमध्ये घरवापसी

योगेश पांडे

ADVERTISEMENT

ashish deshmukh will join bjp 18 june devendra fadnavis nitin gadkari
ashish deshmukh will join bjp 18 june devendra fadnavis nitin gadkari
social share
google news

कॉंग्रेसचे बंडखोर नेते आणि आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची काही दिवसांपूर्वीच पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले होते. आशिष देशमुखांच्या या निलंबनानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आशिष देशमुख येत्या रविवारी 18 जूनला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाचा संपूर्ण कार्यक्रम आता ठरला आहे. (ashish deshmukh will join bjp 18 june devendra fadnavis nitin gadkari)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र काँग्रेसमधील ओबीसी नेते असा उल्लेख करत आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर प्रहार केला आहे. राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागितली असती, तर त्यांना राजीव गांधींकडून झालेली चूक दुरूस्त करता आली असती, असेही देशमुखांनी विधान केले होते. या त्यांच्या विधानानंतर 5 मार्च 2023 रोजी कॉग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांनी कारणे द्या नोटीस बजावली होती.या नोटीशीला आशिष देशमुख यांनी समानधानकारक उत्तर दिली नव्हती. त्यामुळेच कॉंग्रेसच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी आशिष देशमुख यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या होत्या.

हे ही वाचा : ‘बेडूक कितीही फुगला तरी..’, BJP च्या जिव्हारी लागली जाहिरात; खासदाराने शिंदेंना सुनावलं!

निलंबनानंतर दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष देशमुख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतरच आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर आता आशिष देशमुख यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरला आहे. आशिष देशमुख येत्या रविवारी 18 जून 2023 ला केद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोराडी नागपूरमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पूर्वी भाजप घटक पक्षाना आणि आपल्या जुन्या साथीदारांच्या शोधात आहे असं म्हंटल जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता आशिष देशमुख यांची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. या घरवापसीने भाजपची नागपूरमध्ये ताकद वाढणार आहे.

हे ही वाचा : ‘शिंदेंनी देवेंद्रजींशी तुलना करु नये…’, भाजपची खदखद अखेर आली बाहेर!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT