Ram Mandir : ‘अयोध्येत आता गोळीबार… कर्फ्यूही लागणार नाही’, असं का म्हणाले योगी आदित्यनाथ?
Ayodhya Ram Mandir Inauguration : आज आत्मा प्रफुल्लित झाला आहे. कारण मंदिर तिकडेच बनले आहे, जिथे बनवण्याचा संकल्प करण्यात आला होता. या राम मंदिराच्या संकल्पाच्या पुर्णतेसाठी आणि इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेच्या समाप्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन करतो, असे देखील योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी (Pm Narendra Modi) रामलल्लाच्या डोळ्यावरील पट्टी काढून हातात कमळ देऊन त्याची पूजा केली. या पुजेनंतर आता संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या पूजेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) रामभक्तांना संबोधित करताना म्हणाले की,अयोध्येमध्ये आता गोळीबार होणार नाही, कर्फ्यू लागणार नाही, त्याऐवजी दिपोत्सव आणि रामोत्सव साजरा होणार आणि रामनाम किर्तनाने अयोध्या मंत्रमुग्ध होणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (ayodhya ram mandir pran pratishtha pm narendra modi cm yogi adithnath speech for ram devotees ayodhya temple)
ADVERTISEMENT
अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. या सोहळ्याला देशभरातील उद्योजकांपासून, बॉलिवूड कलाकारांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यानंतर रामभक्तांना संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, तब्बल 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्याने मन भावूक झाले आहे.तोंडातून काहीच शब्द उमटत नाही आहेत, अशी अवस्था झाल्याचे योगी आदित्यनाथ सांगतात. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने देशातील प्रत्येक शहर अयोध्या धाम बनलं आहे. आजच्या या ऐतिहासिक दिवशी प्रत्येक मार्ग श्रीराम जन्मभूमीच्या दिशेने येतो आहे. प्रत्येकाच्याच मनात राम नाम जप आहे. रामभक्तांचे डोळे हे दृष्य पाहून पाणावले आहेत. संपूर्ण राष्ट्र राममय झाला आहे, असं वाटतंय आपण त्रेतायुगात आलो असल्याची भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : Ram Mandir Pran Pratishtha: आमंत्रण मिळूनही अडवाणी का गेले नाही अयोध्याला, कारण…
आज रघूनंदन राघव रामलल्ला सिहासनावर विराजमान झाले आहेत. प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात प्रसन्नतेचे वातावरण आहे. रामभक्त आज गर्व आणि समाधानी आहेत. भारताला याच दिवसाची तर प्रतिक्षा होती. आज या दिवसाच्या प्रतिक्षेत तब्बल 500 वर्ष उलटली आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. तसेच श्री राम जन्मभूमी विश्वातला पहिलं असे प्रकरण असेल जिकडे एका देशाच्या बहुसंख्य समाजाने आपल्याच देशात आपल्या आराध्या दैवताच्या जन्मस्थळावर मंदिर निर्माणासाठी इतक्या वर्षापर्यंत आणि विविध स्तरावर लढाई लढली असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आज आत्मा प्रफुल्लित झाला आहे. कारण मंदिर तिकडेच बनले आहे, जिथे बनवण्याचा संकल्प करण्यात आला होता. या राम मंदिराच्या संकल्पाच्या पुर्णतेसाठी आणि इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेच्या समाप्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन करतो, असे देखील योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. इकतचं नाही तर योगी आदित्यनाथ यांनी मुर्ती कलाकाराचे ही अभिनंदन केले. भाग्यवान आहे आपली पिढी जी या सोहळ्यास साक्ष ठरली आहे, आणि त्याहून भाग्य त्यांचे आहे, ज्यांनी या रामकाजसाठी आपले सर्वस्व समर्पित केले आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
हे ही वाचा : Pran Pratishtha : काय असते प्राणप्रतिष्ठा ज्यामुळे दगडाच्या मूर्तीत प्रकटतो देव!
दरम्यान आता प्रभू रामाच्या कृपेने आता अयोध्येत कुणाचीही बाधा येणार नाही आहे. अयोध्येमध्ये आता गोळीबार होणार नाही, कर्फ्यू लागणार नाही, त्याऐवजी दिपोत्सव आणि रामोत्सव साजरा होणार आणि रामनाम किर्तनाने अयोध्या मंत्रमुग्ध होणार आहे, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच भव्य दिव्य राम मंदिराला साकाररूप देणारे वास्तुविधी, अभियंता, शिल्पकार आणि तीर्थ क्षेत्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार योगी आदित्यनाथ यांनी मानले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT