Maharashtra Politics: कोण अजितदादांसोबत अन् कोण पवारांसोबत? NCP आमदारांची संपूर्ण यादी
अजित पवारांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. मात्र, अजित पवारांना नेमका किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics News Live Today: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पक्षातील एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. या शपथविधीनंतर अजित पवारांनी असा दावा केला की पक्षातील बहुसंख्य आमदार (MLA) हे आमच्यासोबत आहे. मात्र, त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, अनेक आमदारांनी सांगितलं की, त्यांना राजभवनवर बोलावून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. पण आपली भूमिका वेगळी आहे. आता या दोन्ही वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीतील नेमके कोणते आमदार कोणासोबत आहेत याबाबत मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे. यामुळे आता अजित पवारांनी दुसऱ्यांदा जे बंड केलं आहे ते यशस्वी होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. (big political earthquake swearing in dcm ajit pawar ncp mla list sharad pawar maharashtra politics update live)
ADVERTISEMENT
अजित पवार आणि इतर आमदारांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच आमदार हे हजर असल्याचं पाहायला मिळालं. पण आता हे आमदार नेमके अजित पवारांसोबत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
हे ही वाचा >> Ajit Pawar BJP: ‘अनेक आमदारांनी सांगितलं तिथे आमच्या सह्या घेतल्या…’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
सगळ्यात आधी जाणून घेऊया 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार निवडून आले होते.
1. अनिल पाटील – अमळनेर (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
2. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
3. अनिल देशमुख – काटोल
4. राजेंद्र कारेमोरे – तुमसर
5. मनोहर चंद्रिकापुरे – अर्जुनी मोरगाव
6. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
7. इंद्रनिल मनोहर नाईक – पुसद (शपथविधीला हजर)
8. चंद्रकांत नवघरे – वसमत
9. राजेश टोपे – घनसावंगी
10. नितीन पवार – कळवण
11. छगन भुजबळ – येवला (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
12. माणिकराव कोकाटे – सिन्नर
13. दिलीप बनकर – निफाड
14. नरहरी झिरवळ – दिंडोरी (शपथविधीला हजर)
15. सरोज अहिरे – देवळाली (शपथविधीला हजर)
16. सुनिल भुसारा – विक्रमगड
17. दौलत दरोडा – शहापूर (शपथविधीला हजर)
18. जितेंद्र आव्हाड – मुंब्रा-कळवा
19. नवाब मलिक – अणूशक्तिनगर
20. अदिती तटकरे – श्रीवर्धन (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
21. अतुल बेनके – जुन्नर (शपथविधीला हजर)
22. दिलीप वळसे-पाटील – आंबेगाव (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
23. दिलीप मोहिते – खेड-आळंदी
24. अशोक पवार – शिरुर (शपथविधीला हजर)
25. दत्ता भरणे – इंदापूर
26. अजित पवार – बारामती (शिंदे-फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ)
27. सुनील शेळके – मावळ
28. अण्णा बनसोडे – पिंपरी
29. सुनिल टिंगरे – वडगाव शेरी (शपथविधीला हजर)
30. चेतन तुपे – हडपसर
31. किरण लहामटे – अकोले (शपथविधीला हजर)
32. आशुतोष काळे – कोपरगाव
33. प्राजक्त तनपुरे – राहुरी
34. निलेश लंके – पारनेर (शपथविधीला हजर)
35. संग्राम जगताप – अहमदनगर शहर (शपथविधीला हजर)
36. रोहित पवार – कर्जत जामखेड
37. प्रकाश सोळंखे – माजलगाव
38. संदीप क्षीरसागर – बीड
39. बाळासाहेब आजबे – आष्टी
40. धनंजय मुंडे – परळी (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
41. बाबासाहेब पाटील – अहमदपूर
42. संजय बनसोडे – उदगीर (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
43. बबन शिंदे – माढा
44. यशवंत माने – मोहोळ
45. दीपक चव्हाण – फलटण
46. मकरंद जाधव – वाई
47. बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
48. शेखर निकम – चिपळूण (शपथविधीला हजर)
49. राजेश नरसिंग पाटील – चंदगड
50. हसन मुश्रीफ – कागल (अजित पवारांसोबत – मंत्रिपदाची शपथ)
51. जयंत पाटील – इस्लामपूर
52. मानसिंग नाईक – शिराळा
53. सुमनताई पाटील – तासगाव-कवठेमहाकाळ
हे वाचलं का?
2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 54 आमदार निवडून आले होते. मात्र 2020 साली पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर तिथे जी पोटनिवडणूक झाली तिथे भाजपचे समाधान आवताडे हे आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे 53 आमदारांचं बळ आहे. मात्र, आता यापैकी नेमके किती आमदार अजित पवारांसोबत आहेत आणि कोण शरद पवारांसोबत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : “शरद पवारांनी आता काय सिल्व्हर ओक घरही द्यायचं का?”
दरम्यान, अजित पवारांच्या या शपथविधीला एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 आमदार (विधानसभा आणि विधानपरिषदेचे मिळून ) हजर होते. ज्यापैकीअजित पवार यांच्यासह 9 आमदार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. पण हजर असलेल्या इतर आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे का? याबाबत संभ्रम कायम आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे आमदारांचा नेमका आकडा समोर आल्यानंतरच पक्षातील आमदारांचा पाठिंबा कोणाला आहे हे स्पष्ट होईल. पण आजच्या राजकीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाला एक नवं वळण मिळालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT