Nitish Kumar : ‘लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार…’, प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जेडीयूचे दिग्गज नेते नितीश कुमार म्हणाले, “परिस्थिती अशी होती की मला राजीनामा द्यावा लागला.
ADVERTISEMENT
Prashant kishor Prediction on Nitish Kumar : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पक्षासह भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील होत आज नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant kishor) यांच्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. बिहारमध्ये निर्माण झालेली जनता दल (युनायटेड)-भाजप युती फार काळ टिकणार नाही, असा मोठा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. या त्याच्या भविष्यवाणीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (bihar political crisis prashant kishor prediction nitish kumar resignation janata dal united bjp nda rejoin lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये पुन्हा सामील झाल्याच्या काही तासानंतर प्रशांत किशोर यांनी ही भविष्यवाणी केली होती. पत्रकारांशी बोलताना किशोर म्हणाले की, बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेली युती 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही, याचा अर्थ जेडी(यू) -भाजप सरकारचे आयुष्य एक वर्ष किंवा त्याहून कमी असेल, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
हे ही वाचा : Nitesh Rane : “पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय”
“सध्या अस्तित्वात असलेली रचना, ज्यामध्ये नितीश कुमार एनडीएचा चेहरा आहेत आणि त्यांना भाजपचा पाठिंबा आहे, तो (बिहार) विधानसभा निवडणुकीपर्यंत अस्तित्वात राहणार नाही. मी तुम्हाला हे लेखी देऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांत बदल होईल,” असे देखील प्रशांत किशोर यांनी स्पष्ट सांगितले आहे.
हे वाचलं का?
‘या’ कारणामुळे दिला राजीनामा
बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जेडीयूचे दिग्गज नेते नितीश कुमार म्हणाले, “परिस्थिती अशी होती की मला राजीनामा द्यावा लागला. नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचे कारण म्हणून महागठबंधन आघाडी अंतर्गत परिस्थिती “योग्य नाही” असे नमूद केले. आपल्या कार्यकर्त्यांसह सर्व ठिकाणाहून आपल्याला सूचना येत असून, या निर्णयापर्यंत येण्यासाठी आपण सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना सुनावलं, ‘मराठा आरक्षणात आम्ही सुवर्णमध्य…’
दरम्यान नितीश कुमारांनी आतापर्यंत नऊवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी पाचवेळा तर, दोन वर्षांत दोनवेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT