Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह Video, आव्हाडांच्या मुलीचं ‘ते’ ट्वीट प्रचंड चर्चेत
किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचं ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे ते चुकीचे असल्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली होती. ज्याबाबत आता त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
Kirit Somaiya latest news: मुंबई: भाजपचे (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (offensive video) समोर आल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. विरोधकांनी त्यांच्यावर तुफान टीका देखील केली. मात्र, असं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (NCP mla Jitendra Awhad) यांनी मात्र, किरीट सोमय्यांवर ज्या प्रकारे टीका केली जात आहे ती चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. ‘हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी.’ असं आव्हाड काल म्हणाले होते. मात्र, आता त्यांच्या याच प्रतिक्रियेबाबत जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड (Natasha Awhad) हिने एक ट्वीट केलं आहे. जे सध्या खूपच चर्चेत आलं आहे. (bjp leader kirit somaiya offensive video ncp mla jitendra awhad daughter natasha awhad reacted latest update on maharashtra politics)
ADVERTISEMENT
नताशा आव्हाड हिचं नेमकं ट्विट काय?
सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओनंतर जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलेलं की, ’30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.’ आव्हाडांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली त्याच भूमिकेचं त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने ट्विट करत ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Kirit Somaiya : सोमय्यांचे सर्व व्हिडीओ मुंबई पोलीस घेणार ताब्यात, कारण
नताशाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे!’
बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे! https://t.co/HGWmZunrRo
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 18, 2023
किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओबाबत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
‘राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Kirit Somaiya : ‘नवीन पॉर्नस्टार गिरगीट सोमय्या’, व्हिडीओनंतर कल्याणमध्ये…
‘त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.’
ADVERTISEMENT
‘मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबा-याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सोमय्या प्रकरणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT