भाजप महाराष्ट्रात नेतृत्व बदलणार?, विनोद तावडेंचं कोणाकडे बोट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

BJP National General Secretary Vinod Tawde told the formula for allotment of tickets for the upcoming elections
BJP National General Secretary Vinod Tawde told the formula for allotment of tickets for the upcoming elections
social share
google news

Vinod Tawade: नुकताच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळाले. त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदावर नव्या चेहऱ्यांना संधी देत धक्कातंत्राचाही वापर करण्यात आला. तीन राज्यातील भाजपच्या घवघवीत यशानंतर आता भाजपकडून महाराष्ट्रातही बदल करणार का या प्रश्नावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (National General Secretary)  विनोद तावडे यांनी थेट उत्तरच दिले आहे. नेतृत्व बदलाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपचा कोणताही उमेदवार सलग दोन-तीन वेळा निवडून आला म्हणून त्याला तिकीट मिळेल असं नाही. त्यासाठी भाजपची वेगळी रणनीति असून गेल्या पाच वर्षातील उमेदवारांची कामगिरी बघूनच विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

भाजपने तीन राज्यात धक्कातंत्राचा वापर करून मुख्यमंत्री पदाची माळ नव्य नेत्यांच्या गळ्यात टाकली, त्यावरूनच त्यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं का असा सवाल करण्यात आला. त्यावरही त्यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर देत सांगितले की, तेही माझ्याच हातात आहे मात्र मी मुख्यमंत्री होईल का असा प्रश्न पत्रकारांना का पडत नाही असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकारांना केला. त्यामुळे राज्यातील राजकारणात भाजपकडून धक्कातंत्र देत बदल होऊ शकतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

 भाजप मुसंडी मारणारच

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाकडून 2014 नंतर देशातील राजकारणाच्या मुख्य प्रणालीमध्येच मोठे बदल घडवून आणले गेले. त्यामुळे देशातील आगामी निवडणुकीत भाजप जोरदार मुसंडी तर मारणारच आहे. मात्र त्याचबरोबर मागील निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपला अधिक जागा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

हे वाचलं का?

तसा निर्णय होणार नाही

भाजपकडून राजकारणाच्या मुख्य प्रणालीमध्ये बदल घडवून आणल्यामुळेच तीन राज्यात मुख्यमंत्री पदावर नवे चेहरे बसवण्यात आले. त्यावरही त्यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, एखादा खासदार किंवा आमदार सलग दोन-तीन वेळा निवडून आला आहे म्हणून त्याला तिकीट दिले जाईल असं नाही. कारण भाजप त्यासाठी तिकीट वाटप करण्याआधी मागील पाच वर्षातील उमेदवारांची कामगिरी विचारात घेऊनच उमेदवारीचा विचार करते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> Mla Disqualification : “शिंदेंनी तसं केलंच नाही”, ठाकरेंनी नार्वेकरांना काय सांगितलं?

निर्णय कामगारीवरच

विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदापासून ते अगदी आगामी काळातील तिकीट वाटपाच्या प्रश्नावरही त्यांनी सडेतोड उत्तर दिली आहेत. तिकीट वाटपाचा प्रश्न राज्यात असो किंवा देशाचा असो भाजपकडून उमेदवारी देताना ती त्यांच्या कामगिरीवरच देण्याचा निर्णय होणार असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र

सरचिटणीस विनोद तावडे यांना यावेळी त्यांच्या उमेदवारीही अनेक प्रश्न विचारण्यात आले. राज्याच्या राजकारणावर त्यांना सवाल करण्यात आल्यावर त्यांनी सांगितले की, पक्षाकडून मला जी जबाबदारी देण्यात आली त्यावरच सध्या माझे लक्ष केंद्रीत केले आहे, त्यामुळे ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र म्हणत त्यांनी त्या प्रश्नावर त्यांनी पडदा टाकला आहे. पक्षाकडून जी माझ्यावर जबाबदारी देण्यात येईल त्याचे पालन केले जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

राजकीय परिस्थिती वेगळी

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करून नव्या चेहऱ्यांना सीएम पदासाठी संधी देण्यात आली असली तरी तसाच राज्यात प्रयोग केला जाईल असं काही सांगता येणार नाही. कारण प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असल्याने त्यानुसार पक्षाला काही निर्णय घ्यावे लागतात असंही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पदाचा निर्णय सामूहिक घेणार

महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणूक लढणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णयही सामूहिकरित्याच घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> Salim Kutta: ‘त्यांचं’ नाव घेतलं तर तुम्हाला एवढ्या का मिरच्या लागल्या?, खडसेंचे प्रचंड गंभीर आरोप

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT