‘BJP ला आज कळलं असेल ‘या’ माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा’, जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
शिवसेनेने माध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरुन भाजप-शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. तर याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जहरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
नागपूर: “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, या शिवसेनेकडून (Shiv Sena) देण्यात आलेल्या जाहिरातीवरून भाजप-शिवसेना युतीत जोरदार धुसफूस सुरू झाली आहे. एकीकडे भाजप (BJP) शिवसेनेच्या महत्त्वाच्या मतदारसंघांवर दावा सांगत असतानाच मंगळवारी अचानक एक अशी जाहिरात प्रकाशित झाली की, ज्यामुळे भाजपचं राज्यातील आणि केंद्रीय नेतृत्व देखील नाराज झालं असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. असं असताना याच मुद्द्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (bjp shiv sena cm eknath shinde devendra fadnavis advertisement dispute ncp jitendra awhad)
ADVERTISEMENT
‘खांद्यावर पाय ठेवायचा आणि डोक्यावर जायचं.. हा या माणसाचा स्वभाव’
‘आज त्यांना कळलं असेल या माणसाची राक्षसी महत्वाकांक्षी आहेत हे आजच्या जाहिरातीतून स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या नकाशावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न झाला. पण ते होणार नाही, म्हणजे खांद्यावर पाय ठेवायचा आणि डोक्यावर जायचं.. माणसाच्या स्वभावाचा आणि चरित्राचा भाग आहे.’ अशी अत्यंत जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.
‘मविआ एकत्र लढली तर 200 च्या खाली येणारच नाही…’
‘सामान्य माणसाच्या घरात जा आणि ते काय म्हणतात ते बघा, शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी राहुल गांधी हे सगळे मिळून एकत्र लढले तर 200 जागांच्या खाली येतच नाही. शिंदे साहेबांना बरोबर घेऊन भाजपने स्वतःच्या सर्वात मोठा नुकसान केलं, त्यांचं का नुकसान होणार ते बोलायलाच नको.’
हे ही वाचा >> Mumbai :आर्थर रोड जेल हादरला! दोन कैद्यांकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार
‘बावनकुळे म्हणाले मविआचे शंभर ते दीडशे जागा येणार, दीडशेच्या आधी 144 जागा येतात आणि ज्यांना 144 जागा मिळतील ते महाराष्ट्रात सरकार बनवतील.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मविआचं राज्यात सरकार येईल असा दावा यावेळी केला आहे.
‘संविधानाच्या विरोधात जाऊन तेव्हा तुम्ही सत्तेत बसता तेव्हा तुमच्यावर डाग असतो…’
‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला तेव्हा सांगितलं की हे सरकार गेलं, संविधानाच्या विरोधात जाऊन तेव्हा तुम्ही सत्तेत बसता त्यावेळी तुमच्यावर डाग असतो. काँग्रेसला जर सर्व्हेमध्ये 21 मिळणार असतील तर आम्ही 40 वर जाणार. मी महाविकास आघाडीचा सर्व्हे सांगतो. सगळ्या मतदार संघाचा आढावा घेणं आता सुरू आहे आणि साधारणतः जे वातावरण आहे त्याची माहिती घेता येते. पवार साहेबांना प्रत्येक मतदारसंघाचा पॉलिटिकल सेन्स माहिती आहे.’ अशी टीकाही जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Shiv Sena : जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटो का नाही? CM एकनाथ शिंदे म्हणाले…
त्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस नाराज?
दरम्यान, शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे भाजपतून नाराजीचा सूर उमटला आहे. कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हा दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT