BJP: ‘उद्धव ठाकरे अहंकाराच्या नशेत झिंगून…’ देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर बावनकुळे प्रचंड संतापले!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

bjp state president chandrasekhar bawankule was furious after the venomous criticism of deputy chief minister devendra fadnavis in the saamana editoral latest political news maharashtra
bjp state president chandrasekhar bawankule was furious after the venomous criticism of deputy chief minister devendra fadnavis in the saamana editoral latest political news maharashtra
social share
google news

Chandrasekhar Bawankule BJP: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून (saamana editoral) आज (19 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तुफान टीका करण्यात आली. ज्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrasekhar bawankule) यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बावनकुळेंनी संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. (bjp state president chandrasekhar bawankule was furious after the venomous criticism of deputy chief minister devendra fadnavis in the saamana editoral latest political news maharashtra)

ADVERTISEMENT

‘देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे.’ अशी टीका सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आली होती.

याच टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत.’ असं म्हणत बावनकुळेंनी आपला संताप व्यक्त केलाय.

हे वाचलं का?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन कसा साधला निशाणा?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातून जहरी शब्दात टीका करण्यात आल्यानंतर बावनकुळेंनी आपल्या ट्विटरवरुन ठाकरेंना तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे.

‘किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्रजींच्या विरोधात गरळ ओकली.’

ADVERTISEMENT

‘२०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.’

ADVERTISEMENT

‘उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत.’

‘सुंभ जळाला तरी पिळ कायम ‘ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत.’

‘पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा.’ अशा शब्दात बावनकुळेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर वाटोळं होईल’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांनाही इशारा

‘सामना’तून देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका

  • झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. ‘‘मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,’’ असे श्री. फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे.
  • गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून ‘पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले. आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही.
  • आता 2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. फडणवीस व त्यांचा पक्ष अर्धग्लानीत असला तरी महाराष्ट्राची जनता झोपेत नाही. बेइमानी केली ती भाजपच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व श्री. फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत. ही बेइमानी तेव्हा झाली नसती तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत. 2019 च्या बेइमानीमुळेच शिवसेना-भाजपची युती तुटली.
  • देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱयाने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!

अशी जहरी टीका सामनातून करण्यात आली होती. ज्याला आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. आता याबाबत देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT