NCP Crisis : ‘…मग आम्ही कोण?’ छगन भुजबळांनी केली शरद पवारांची कोंडी, थेटच बोलले
राष्ट्रवादी काँग्रेस वाद : अजित पवारांना तुम्ही नेता म्हणता, मग आम्ही कोण आहोत? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना घेरले आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून छगन भुजबळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना लक्ष करत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून छगन भुजबळ शरद पवारांना घेरताना दिसत आहेत. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी आता अजित पवारांबद्दल घेतलेल्या सकारात्मक भूमिकेवरून शरद पवारांना कोंडीत पकडलं आहे. नेमकं भुजबळ काय म्हणालेत, तेच समजून घ्या. (chhagan bhujbal Asked sharad Pawar, if ajit pawar is your leader then who we are?)
ADVERTISEMENT
मुलाखतीत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी छगन भुजबळांनी मग आम्ही कोण आहोत? थेट सवाल शरद पवारांना केला. भुजबळ म्हणाले, “मी शरद पवारांच्या विरोधात काही बोलत नाहीये, मी फक्त चार गोष्टी सांगितल्यात. तुम्ही येवल्यात आलात, भुजबळांना विरोध केला. बीडमध्ये मुंडेंना विरोध केला. कोल्हापुरात मश्रीफांना विरोध केलात. बारामतीत गेलात, तिथे म्हणालात की अजित पवार आमचे नेते आहेत, हे बरोबर आहे का?”, असा सवाल भुजबळांनी केलाय.
शरद पवारांना छगन भुजबळांचा सवाल
पुढे ते म्हणालेत की, “अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेलो. ते तुमचे नेते आहेत; मग आम्ही कोण आहोत? हा आमचा प्रश्न आहे. त्यात टीका कुठून आली?”, असे भुजबळ म्हणाले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती कोटी संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?
बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या वादावर भुजबळ काय बोलले?
बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी शिवसेना सोडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची गोष्टच वेगळी होती. त्यावेळी मी कुठे कटू भूमिका घेतली होती? मी शांतच होतो, पण ते मला लखोबा म्हणायचे. व्यंगचित्र काढण्यातून वाद वाढला. मग मला वाटलं की बोलायला पाहिजे. पण कुठे थांबायचं हे आम्हाला कळलं.”
समजून घ्या >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?
“मी नंतर बाळासाहेब ठाकरेंवरील खटला मागे घेतला. बाळासाहेबांनीही मला सहकुटुंब जेवायला बोलावलं. सगळा वाद मिटला”, असे भुजबळ यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT