Chhagan : भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसींच्या बैठकीत झालेले 3 महत्वाचे ठराव काय?
आज छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आले आहेत. हे तीन ठराव नेमके काय आहेत, हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal OBC meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढल्यानंतर राज्यातील ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या नेत्यांनी या अधिसूचनेला आव्हान देण्याची तयारी केली आहे. यासाठी आज छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आले आहेत. हे तीन ठराव नेमके काय आहेत, हे जाणून घेऊयात. (chhagan bhujbal obc meeting what are the 3 important resolutions passed in the meeting of obc read full story)
ADVERTISEMENT
ओबीसींच्या बैठकीत सध्या चालू असलेल्या आरक्षणाच्या परिस्थितीवर काही ठराव देखील मंजूर करण्यात आले. हे ठराव खालीलप्रमाणे आहेत.
पहिला ठराव
महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब दिनांक २६ जानेवारी २०२४ नुसार मसूदा काढला आहे. यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे दि.२६ जानेवारी २०२४ च्या राजपत्राचा मसूदा रद्द करण्यात यावा.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Nitish Kumar : ‘लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार…’, प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
दुसरा ठराव
महाराष्ट्र सरकार नियुक्त न्या. संदीप शिंदे समिती ही असंविधानी असून, मागासवर्ग आयोग नसताना मराठा – कुणबी / कुणबी – मराठा जात नोंदींचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगाने (राज्य किंवा राष्ट्रीय आयोग) मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे. सदर मराठा – कुणबी / कुणबी – मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी.
तिसरा ठराव
भारतीय संविधानातील आर्टिकल 338 (ब) प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले (CONFLICT OF INTEREST) सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना मा. न्या. सुनील सुक्रे, श्री ओमप्रकाश जाधव, प्रा. अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागासवर्ग आयोगावर बेकायदेशीर पध्दतीने नियुक्त्या केल्या. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावेत असे अपेक्षित असताना मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री सुनील शुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय (Activist) कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमुर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असे तीन ठराव यावेळी करण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maratha Reservation : “ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच OBC आरक्षण”, CM शिंदे स्पष्टच बोलले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT