‘लोकसभेनंतर राज्यात राजकीय भूकंप’, पंतप्रधानांसमोरच CM शिंदेंचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chief Minister Eknath Shinde claimed that political activities in Maharashtra will speed up after the Lok Sabha elections
Chief Minister Eknath Shinde claimed that political activities in Maharashtra will speed up after the Lok Sabha elections
social share
google news

CM Eknath Shinde: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याचा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे (Atal Bihari Vajpayee Shivdi-Nhavasheva Atal Setu) उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. देशातील हा सर्वात लांब सागरी पूल असून दक्षिण मुंबईला नवी मुंबईतील न्हावा-शेवाला जोडला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

विकास बुलेट स्पीडने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट स्पीडने प्रगती करत आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार असून अनेकांना त्याचा मोठा धक्का बसणार आहे.

हे ही वाचा >> Milind Deora : काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप, मुंबईचा ‘हा’ नेता शिंदे गटात करणार प्रवेश?

चारशेहून अधिक जागा

एकीकडे राजकीय भूकंप होणार आहे तर दुसरीकडे आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 400 हून अधिक जागा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करून दाखवला. त्याच बरोबर महाराष्ट्रात सत्तारुढ आघाडी लोकसभेच्या निवडणुकीत 48 जागांपैकी 45 जागांपेक्षा अधिक जागा जिंकतील असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

नार्वेकरांच्या निर्णयाचा परिणाम

विधान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितल्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही गटांतील आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या सगळ्या याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी हा दोन दिवसांनी विश्वास व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 55 पैकी 37 आमदार असून शिंदे गटातील 16 आमदारांचे सदस्यत्व अबाधित राहणार असल्याचेही सभापतींकडून स्पष्ट करण्यात आले होते.

विकास प्रकल्प

यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, जून 2022 मध्ये आमचे सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील रखडलेले विकास प्रकल्प आम्ही पुन्हा सुरु केले असून राज्याची वाटचाल विकासाच्या दिशेन चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, ‘बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण हे ‘घरगडी’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT