‘एकनाथ शिंदे अपात्र होणारच नाहीत’, फडणवीसांनी थेट दावाच केला
उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार असं सांगितले जात आहे. मात्र आम्ही कायद्याचा अभ्यास करुन सांगतो आहे की, एकनाथ शिंदे हे अपात्र होणार नाहीत. त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळही ते पूर्ण करुन आगामी निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढू असा निर्धारही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ (me punha yein) हा व्हिडीओ पुन्हा एकदा ट्विट करण्यात आला. त्यानंतर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरलही झाला. त्यामुळे राज्यातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविषयीही जोरदार चर्चा चालू झाली. त्याविषयावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलतान सांगितले की, असे व्हिडीओ ट्विट (Viral Video) करुन कधी सत्ताबदल होतो का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी काळातील निवडणुकही आम्ही जिंकू असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईनला दिलेल्या मुलाखती व्यक्त केला आहे.(chief minister eknath shinde will not be disqualified claims deputy chief minister fadnavis)
ADVERTISEMENT
सरकारमध्ये सगळे आलबेल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत मी पुन्हा येईन या व्हिडीओविषयी, सत्ताबदल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर तुमचे विचार जुळतात का?, तर त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्याविषयावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगत महायुतीच्या सरकारमध्ये सगळे आलबेल चालले असून आमच्या तिघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >> Chandra Grahan 2023: चंद्र ग्रहणाचा सुतक काळ सुरु, पुढचे 9 तास अजिबात करू नका ‘या’ चुका!
कायद्याचा अभ्यास केला
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यावेळेपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदार अपात्र ठरणार असल्याचे सांगितले गेले. मात्र त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीच अपात्र होणार नाहीत. ते अपात्र होणार नाहीत हे आम्ही कायद्याचा अभ्यास करुन सांगतो आहे असंही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
‘ते’ भाबडी आशा दाखवतात
एकनाथ शिंदे हे अपात्र होणार नाहीत आणि जरी ते अपात्र झाले तरी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. कारण त्यांना विधान परिषदेवरही संधी मिळू शकते. त्यामुळे ज्या काही माध्यमांवर अपात्रतेच्या बातम्या चालवल्या जातात त्या उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि त्यांच्याकडूनच ही अपात्रतेची भाषा केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितले. कारण जी काही त्यांच्याकडे शिवसेना राहिली आहे. त्यांचे नेते राहिले आहेत, त्यांना ते भाबडी आशा दाखवतात असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation: अजित पवारांवर मोठी नामुष्की, चक्क बारामतीचा दौरा रद्द; काय घडलं?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT