BMC: ठाकरेंना आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

covid center scam Case bmc former mayor kishori pednekar case has been registered in police station
covid center scam Case bmc former mayor kishori pednekar case has been registered in police station
social share
google news

कोविड सेंटर घोटाळा (covid center scam) प्रकरणी आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मु्ंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत किशोरी पेडणेकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्याचसोबत ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. (covid center scam Case bmc former mayor kishori pednekar case has been registered in police station)

ADVERTISEMENT

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कोविड सेंटर घोटाळ्याची (covid center scam) चौकशी केली जात होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात फसवणूक आणि गैरव्यवहाराचा गुन्हा नोदवण्यात आला आहे.किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटर प्रकऱणी हे गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सुजित पाटकरला अटक

दरम्यान याआधी 20 जुलैला कोव्हिड घोटाळा प्रकरणी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)अटक करण्यात आली. साधारण एक महिन्यापूर्वी ईडीने मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी केली होती. ज्यामध्ये शिवसेना (UBT) पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांची देखील चौकशी झाली होती. त्याचबरोबर सुजीत पाटकर यांची देखील चौकशी झाली होती. सुजित पाटकर यांची ईडीने दोनदा चौकशी केली होती. आता ईडीकडून ही कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे.

हे वाचलं का?

ठाकरेंना अडचणीत आणणारे प्रकरण काय?

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरु केले. हे कोविड सेंटर वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांना चालवण्याचे कंत्राट दिले होते. त्यातीलच एक नाव म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस! याच कंपनीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते.

मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणाची सुरूवात झाली ती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीने! ही तक्रार समजून घेतली हे संपूर्ण प्रकरण लक्षात येतं. किरीट सोमय्या यांनी 24 ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते अडकत गेले.

ADVERTISEMENT

लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेट कुणाची?

माजी खासदार सोमय्या यांच्या आरोपानुसार या कंपनीची स्थापना 26 जून 2022 रोजी झालेली आहे. या फर्मचे भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शाह, राजू साळुंखे आहेत. या संस्थेची नोंदणी मुंबईतील वांद्रे यथील कार्यालयात करण्यात आलेली आहे.

ADVERTISEMENT

आरोप काय?

लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने वरळीतील एनएससीआय जम्बो कोविड सेंटर आणि दहिसर जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. सोमय्यांच्या आरोपानुसार कंपनीने कोविड सेंटरला पुरवलेल्या सेवेबद्दल मुंबई महापालिकेकडे 38 कोटींचे बिले दिली आणि पैसे मिळवले.

या कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारेच मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स जम्बो कोविड सेंटर आणि मुलुंड जम्बो कोविड सेंटरचेही कंत्राट मिळवले.

सोमय्यांच्या म्हणण्यानुसार दुसरीकडे इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस एलएलपी या फर्मनेही जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा सादर केल्या. या कंपनीमध्ये सुजित मुकुंद पाटकर आणि राजू नंदकुमार सांळुखे हे भागीदार आहेत. यात संदिप हरिशंकर गुप्ता, योगेश्वर भूमेश्वर उल्लेंगल्ला, अपर्णा श्रीकांत पंडितही भागीदार असल्याचा दावा सोमय्यांनी केलेला.

सोमय्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे की, वैद्यकीय सेवा पुरवण्याचा अनुभव नसताना खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने जम्बो कोविड सेंटरची कंत्राट मिळवली. त्याचबरोबर या फर्मवर बंदी घालण्यात आली होती. ती बाब लपवून कंत्राट मिळवलं. अटी शर्थींनुसार सेवा न पुरवल्यामुळे कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आणि याला लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट जबाबदार आहे, असा सोमय्यांचा आरोप केला होता.

लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने मुंबई महापालिकेकडून 38 कोटी रुपये मिळवले आणि महापालिका आणि शासनाची फसवणूक केली. किरीट सोमय्यांनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी स्वतंत्रपणे करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT