विरोधी पक्षांच्या 143 खासदारांचं निलंबन, शरद पवार म्हणाले, ‘संसदेच्या इतिहासात…’
सरकार विरोधकांना डावलून, त्यांच्याबरोबर संवाद न साधता कोणते निर्णय घेत असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीने चूक आहे. मात्र सरकार या पद्धतीने 141 खासदारांचे निलंबन करून पाहिजे तसे निर्णय घेत असेल तर त्यांना जनताच योग्य उत्तर देईल असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) 141 खासदारांचे निलंबन (Suspension of MP’s) करण्यात आले आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्या घटनेमुळे विरोधकांनी आज संसद भवन परिसरात या घटनेचा तीव्र निषेधही व्यक्त केला. त्या घटनेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party) यांनी आपले मत व्यक्त अजूनपर्यंतच्या इतिहासात जे कधी घडलं नाही ते या सरकारने (Government) केले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी संवाद असला पाहिजे मात्र हे सरकार आता विरोधकांशिवाय आणि संवादाशिवाय कोणताही निर्णय घेणार असेल तर ती लोकशाहीची थट्टा असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
सरकारनेच स्पष्ट भूमिका मांडावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदेतील घुसेखोरी विषयी बोलतान ते म्हणाले की, ज्या लोकांनी घुसखोरी केली आहे, त्यांना संसदेत प्रवेश कसा मिळाला, त्यांनी ते कृत्य का केले? त्याबाबत सरकारनेच स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. त्यावर विरोधकांनी जर स्पष्टीकरण मागितले तर त्यावर त्यांनीही स्पष्टीकरण दिले पाहिजे, मात्र या सरकारने ती तयारी दर्शवली नाही. मात्र त्यापुढे जाऊन सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रकारे खासदारांचे निलंबन केले आहे, ती घटना मात्र संसदेच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल असं सांगत हे असं पहिल्यांदाच घडले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >> RSS on Caste Census : जातनिहाय जनगणनेबद्दल संघाने बदलली भूमिका, पण…
जनताच उत्तर देईल
लोकसभा असो किंवा विधानसभा असो माझा या दोन्हींचा मिळून 56 वर्षांचा राजकीय प्रवास झाला आहे. या इतक्या वर्षाच्या इतिहासात या घटनेसारखी घटना कधीच घडली नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधकांना डावलून सत्ताधाऱ्यांना कोणते निर्णय घ्यायचे असतील तर सरकार म्हणून ते निर्णय घेऊ शकतात, मात्र तुमच्या या अशा प्रकारच्या निर्णयाला आता जनताच उत्तर देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे वाचलं का?
उपराष्ट्रपतींची नक्कल
खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची केलेली नक्कल ही चूक होती की बरोबर असा सवालही पत्रकारांनी केला. त्यावर शरद पवारांनी सांगितली की, ही घटना संसदेत घडली आहे का ? संसदेच्या सदस्यांनी संसदेबाहेर काय केले तर त्यावर जरूर वाद होऊ शकतो मात्र त्यावरून कोणताही टोकाचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही, आणि तसा निर्णय घेतला गेला तर तो निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
तरच हा प्रश्न सुटू शकतो
सत्ताधारी आणि विरोधक हा वाद आता कधी थांबणार असाही सवालही पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर शरद पवारांनी सांगितले की, ज्या सरकारने ज्या खासदारांना निलंबित केले आहे, त्यांनीच आता त्यांच्याविषयी विचार केला पाहिजे. त्यांच्याबरोबर संवाद साधला पाहिजे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये संवाद असला पाहिजे तरच हा प्रश्न सुटू शकतो असं मतही त्यांनी यावेळी मांडले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Shubham Dubey : ग्लोव्हज घ्यायला नव्हते पैसै, विदर्भाच्या पठ्ठ्याला IPL मध्ये मिळाले कोट्यवधी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT