फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, ‘बाळासाहेब ठाकरेच फक्त वाघ होते, तुम्ही…’
होय, मी विसाव्या वर्षी कारसेवक होतो, बदाऊच्या तुरुंगात त्यासाठी शिक्षाही भोगली असल्याचे सांगत, राम मंदिरासाठी तुम्ही काय केले असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना करत त्यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis : मै गर्व से कहेता हूं मै कारसेवक हूं म्हणत मी विसाव्या वर्षी कारसेवेला गेलो पण तुम्ही काय केला असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला आहे. ठाण्यातील आनंदनगरमध्ये झालेल्या रामकथा कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. ज्या वेळी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा (Babri Masjid) ढाचा पाडला त्यावेळी तुम्ही जंगलात वाघाचे फोटो काढत फिरत होतो असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला. बाबरीचा ढाचा पाडताना आम्ही तिथे एकदा नाही तर अनेक वेळेला गेलो होतो, त्याचबरोबर त्या काळात बाळासाहेब ठाकरेही आमच्यासोबत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे एकटेच वाघ होते, मात्र तुम्ही वाघ नाही आणि तुमच्यासोबतचे कोणीच वाघ नाही असा खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
मी तुरुंगात गेलो
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ठाण्यातील एका कार्यक्रमात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपण कारसेवकाचे असल्याचे अभिमानाने सांगत मी त्यासाठी तुरुंगात गेल्याचे सांगत रामासाठी शिक्षाही भोगून आल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी कारसेवक छातीवर गोळ्या झेलत होते, त्यावेळी तुम्ही जंगलातून फोटो काढत फिरत होता असाही टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे आता तुम्ही अयोध्येला जाऊ शकत नाही कारण तुमच्याकडे तेवढे नैतिक बळ नाही. त्यामुळे तुम्ही अयोध्येला येऊ शकत नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
हे ही वाचा >> Delhi News : 6 जणांचा गाढ झोपेतच मृत्यू! नेमकं घडलं तरी काय?
मी प्रथम कारसेवक
मी प्रथम कारसेवक असून नंतर मी उपमुख्यमंत्री असल्याचे सांगत कारसेवकावरून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची तुलना वाघाबरोबर करत त्यांच्या कामासारखे तुम्हाला जमणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब एकटेच वाघ
बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते मात्र तुम्ही वाघ नाही आणि तुमच्यासोबत असलेलाही कोणी वाघ नसल्याचे सांगत त्यांना त्यांनी डिवचले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट इशारा देत म्हणाले की, तुमच्यासोबतचा एक असा नेता दाखवा जो कारसेवक म्हणून तो बाबरीच्या ढाचा पाडताना उपस्थित होता अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राम मंदिरावरून हा मुद्दा आणखी पेटणार असल्याचे दिसून येत आहे.