Lalit Patil Drug Case : ठाकरेंच्या आमदाराने फडणवीसांना घेरलं, विधान परिषदेत काय घडलं?
ललित पाटील प्रकरणात 4 पोलिसांना बडतर्फ तर 6 पोलिसांना निलंबित केले असल्याची माहिती देवेद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तसेच ड्रग्ज प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही.
ADVERTISEMENT
Lalit Patil Drug Case Devendra Fadnavis vs Anil Parab Vidhan Parishad : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून विधानपरिषदेत आज विरोधकांनी सरकारला घेरलं होते. यावेळी विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील (Lalit Patil Drug) कारवाईची माहिती मागवली. तसेच ठाकरेंचे आमदार अँड अनिल परब (Anil Parab) यांनी रूग्णालयात आरोपीला ठेवण्यासाठी कशाप्रकारे ‘पर डे’चा व्यवहार चालतो, याची माहिती उघड केली होती. विरोधकांच्या या सर्व प्रश्नांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत उत्तर दिली आहेत.(devendra fadnavis answer opposition question vidhan parishad 2023 lalit patil drug case anil parab sachin ahir bhai jagtap)
ADVERTISEMENT
ललित पाटील प्रकरणात 4 पोलिसांना बडतर्फ तर 6 पोलिसांना निलंबित केले असल्याची माहिती देवेद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तसेच ड्रग्ज प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. योग्य ती कारवाई केली नाही तर पुढची पिढी बरबाद होऊ शकते, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच या घटनेमुळे ड्रग्जच्या केसमध्ये कोणाचाही थेट संबंध मिळाला, त्या पोलीस कर्मचाऱ्याला देखील निलंबित केले जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाचे काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी स्वागत केले.
हे ही वाचा : Yavatmal : संजय राऊतांविरुद्ध पोलिसांनी दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?
अशा घटनांमध्ये निव्वल शिपाई आणि कॉस्टेबलवरच कारवाई झाली. पण हे काम एकट्या शिपायांचे नसून काही पोलिसांचाही यात सहभाग असू शकतो, असा संशय भाई जगताप यांनी व्यक्त केला. तसेच रुग्णालयातील अधिष्ठांना बडतर्फ करणार का? पोलीस खात्यातील वरिष्ठांवर कारवाई करणार का? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला होता.
हे वाचलं का?
जर तितके पुरावे असतील तर बडतर्फची कारवाई करण्यात येईल, असे उत्तर फडणवीसांनी दिले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत यांना निलंबित करण्यात आले आहे. आता फक्त त्यांनी सुपरवाय़झरची ड्यूटी व्यवस्थित केली नसल्याने त्यांना निलंबित केले. जर यामध्ये त्यांचा सहभाग आढळला तर त्यांच्यावरही बडतर्फची कारवाई करण्यात येईल. जितकावरचा अधिकारी त्या प्रत्येकावरच कारवाई करू असे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. तसेच आता फक्त ड्रग्ज पेडलवर कारवाई करून थांबायचं नाही.पेडलरने कुठुन आणलं, त्याचा कोणाशी संबंध होता,याचाही तपास केला जाणार आहे.
हे ही वाचा : Deepak Kesarkar : “मविआ सोडणार, भाजपसोबत सरकार… उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं होतं वचन”
ठाकरे गटाचे आमदार अनिब परब यांनी यावेळी मुंबईतील हुक्का पार्लरच्या कारवाईचा मुद्दा मांडला. तसेच रूग्णालयातील अधिष्ठांवर देखील आरोप केला आहे. सर्रास फक्त पेन उचलायचाय आणि आरोग्याचा कुठला आजार झालाय तो लिहायचाय नंतर परडेचा हिशेब घ्यायचाय, असा सर्व कारभार रूग्णालयात सूरू असल्याची माहिती दिली. तुम्ही रूग्णालयातल्या आरोपींची लिस्ट काढा नाहीतर मी तुम्हाला लिस्ट काढून देतो, असे परब यांनी फडणवीसांना म्हणत या अधिष्ठांवर कारवाई करण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आल्या आहेत. शाळांच्या शेजारील तब्बल 2 हजार 369 पानटपऱ्या तोडून टाकल्या आहेत. 38 हजार 873 ई सिगारेटवर कारवाई केली. अवैध हुक्का पार्लरवर कारवाई केली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. अधिष्ठांत आणि आरोपींमध्ये काही प्रमाणात यात संगनमत आहेत. आणि ते मोडून काढावेच लागेल आणि निश्चितपणे ते मोडून काढले जाईल. ससून ही टेस्ट केस आहे.ससून मधल्या कारवाईतून आपल्याला इतर रूग्णालयांना देखील हाच संदेश द्यायचाय, हे चालणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT