Salim Kutta: ‘अशी तडफड तेव्हा का नाही दाखवली तुम्ही?’, देवेंद्र फडणवीस का संतापले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticized to shiv sena ubt over salim kutta and defend to bjp minister girish mahajan
devendra fadnavis criticized to shiv sena ubt over salim kutta and defend to bjp minister girish mahajan
social share
google news

Devendra Fadnavis Vidhanparishad: मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girsh Mahajan) यांचे दाऊदच्या (Dawood) निकटवर्तीयांसोबत फोटो असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विरोधक फारच आक्रमक झाले होते. यावरून सभागृहात बराच गोंधळही झाला. ज्यानंतर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ निवदेन दिलं. यावेळी त्यांनी महाजनांची पाठराखण केली. पण दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (UBT) पक्षावर जोरदार टीका केली. (devendra fadnavis criticized to shiv sena ubt over salim kutta and defend to bjp minister girish mahajan)

ADVERTISEMENT

‘अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर त्या सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही?’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरच टीका केली.

हे ही वाचा>> भाजप महाराष्ट्रात नेतृत्व बदलणार?, विनोद तावडेंचं कोणाकडे बोट?

पाहा विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

नाथाभाऊ आणि काही सदस्यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भात एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. या ठिकाणी ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते.. केवळ गिरीश महाजनच नाही.. सर्व पक्षाचे नेते होते तसंच काही अधिकारी देखील होते. ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरू ज्यांना शहर-ए-खातिम म्हणतात.. त्यांच्या पुतण्याचं लग्न होतं.. त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते.

शहर-ए-खातिम यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या वडिलांचं जे सासर आहे त्या सासरातील एक नातेवाईक ही दाऊदच्या कुठल्या तरी भावाशी तिचं लग्न झालं असा आरोप करण्यात आला त्यावेळी. पण ज्यांच्याशी लग्न झालं त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही.

दाऊदशी संबंधाचा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही. तशा स्वरुपाचा कुठलाही गुन्हा शहर-ए-खातिमवर नाही. ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील आरोप नाही. तथापि अशा प्रकारचा आरोप झाल्यानंतर मी स्वत: गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती. 17-18 मधील ही गोष्ट आहे. तत्कालीन डीसीपीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिला होता. ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, शहर-ए-खातिम यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही.

खरं म्हणजे आज उद्धवजी आले. त्यामुळे कदाचित याठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील. खरं म्हणजे एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता. ज्याची चौकशी अगोदरच झाली आहे.

अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर त्या सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना.. खरं म्हणजे मी हे मी म्हणेन की, कुठलाही संबंध नाही.. पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की, यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.

हे ही वाचा>> Salim Kutta: ‘त्यांचं’ नाव घेतलं तर तुम्हाला एवढ्या का मिरच्या लागल्या?, खडसेंचे प्रचंड गंभीर आरोप

असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांचा दाऊदच्या कोणत्याही व्यक्तीशी संबंध नसल्याचं यावेळी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT