Devendra Fadnavis : ‘…आघाडीची भेंडी झाली’, फडणवीसांनी काढले विरोधकांचे वाभाडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis uddhav thackeray criticize
devendra fadnavis uddhav thackeray criticize
social share
google news

Devendra Fadnavis : ‘आमची परिस्थिती इंडी आघाडीसारखी नाही, मंचावर हे का आहेत, आम्ही का नाही’ असा प्रश्न आम्हाला पडत नाही. कारण आम्ही एका विचाराने एकत्र आलो आहोत असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banjrjee) यांचा किस्सा सांगत विरोधकांच्या खुर्चीसाठी चाललेल्या गोष्टीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ममता बॅनर्जींना शरद पवारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ममतादीदी थांबल्या नाहीत, त्याच प्रमाणे शरद पवार यांनी अजितदादांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तेही थांबले नाहीत असा निशाणाही त्यांनी शरद पवारांवर साधला. मुंबईत झालेल्या महायुती बैठक – लोकसभा 2024 मिशन 48 या बैठकीत बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. (devendra fadnavis criticizes india and uddhav thackeray in lok sabha 2024 mission 48 meeting)

ADVERTISEMENT

विरोधकांनी पीएम पदाचा उमेवार सांगावा

देवेंद्र फडणवीस यांनी इंडियाच्या बैठकीतील 36 राजकीय नेत्यांना सवाल करत तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे सांगा असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना त्यांनी इंडिया म्हणून हे बैठक घेत असले तरी त्यांच्यातील पाच पक्षांनी आता पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे. मात्र ज्यांना पंतप्रधान व्हायचे आहे, त्या राहुल गांधी यांचे कुणी नावच घेतले नाही अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीची भेंडी झाली असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

अर्थव्यवस्थेत भारत एक नंबरवर जाणार

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कार्यक्रमावर बोलताना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांचा संदर्भ देत नरेंद्र मोदींचा गौरव केला आहे. भारतातील अतिगरीबी ही प्रचंड गतीने कमी होत आहे. त्यामुळे थोड्याच कालावधीत भारत हा जगातील एक नंबरची अर्थव्यवस्था होणार असल्याचे सांगत त्यांनी चांद्रयानमुळे भारताचा जगात गौरव झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई तोडण्याचा डाव

निवडणुका जवळ आल्या की, उद्धव ठाकरे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार लोकांना सांगतात. मात्र महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव कुणाच्या बापाला जमणार नाही. बापालाच काय बापाच्या बापाच्या बापालाही ते जमणार नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतात.
महाराष्ट्रद्रोही लोकांनी मुंबईचा विकास करायचा नाही. त्यामुळे मुंबईच्या इकोनॉमिक प्लॅनला विरोध करत असतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. नरेंद्र मोदींच्या विकासामुळे आता मराठी माणसाला मुंबईत घर मिळणार आहे. त्याच बरोबर मुंबई तोडण्याची भाषा फक्त भयाच्या भरवशावर राजकारण करतात तिच लोकं मुंबई तोडण्याची भाषा करतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

छोंडेगे नहीं

विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, जनतेचा विश्वास आता तुमच्यावर राहिला नाही. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कोरोना काळातील मुंबई महानगरपालिकेचा घोटाळा बघा. कारण सहाशे रुपायचं कफन मुंबई महानगरपालिका चालवणाऱ्या लोकांनी सहा हजार रुपयाला विकत घेतलं.त्यामुळे आता कुणालाही छोंडेगे नहीं म्हणत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT