शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?
भाजप आणि राष्ट्रवादी युतीसाठी शरद पवारांनी सुरवातीला ग्रीन सिग्नल दिला. पण तीनचार दिवसांआधी नकार कळवल्याचा दावा फडणवीसांनी केला. पहिल्यांदाच पवारांच्या या कथित रोलबद्दलची माहिती समोर आलीय.
ADVERTISEMENT
Maharashtra political latest news : देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनं पुन्हा खळबळ उडवून दिलीय. शरद पवारांनी टाकलेल्या ट्रॅपमध्ये फडणवीसांचा गेम झाल्याची माहिती समोर आलीय. स्वतः फडणवीसांनीच याबद्दलचे गौप्यस्फोट केल्यानं खळबळ उडालीय. पहाटेच्या शपथविधीबद्दल पवारांचा डबलगेम काय, त्यात ठाकरेंचा रोल काय आणि फडणवीस कसे सापडले हेच समजून घ्या.
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल अनेक नवे गौप्यस्फोट केलेत.
ठाकरेंनी सोडली साथ, फडणवीसांचे गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी युती तोडून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोन घेणंही बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर आम्ही दुसरे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही भाजपाबरोबर येऊ शकतो.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?
फडणवीसांनी पुढे सांगितलं की, “यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीतच महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी या सरकारचं नेतृत्व करणार, असंही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली”, असा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.
भाजप आणि राष्ट्रवादी युतीसाठी शरद पवारांनी सुरवातीला ग्रीन सिग्नल दिला. पण तीनचार दिवसांआधी नकार कळवल्याचा दावा फडणवीसांनी केला. पहिल्यांदाच पवारांच्या या कथित रोलबद्दलची माहिती समोर आलीय.
ADVERTISEMENT
शरद पवारांची माघार, अजित पवारांकडे नव्हता पर्याय -फडणवीस
फडणवीस पुढे म्हणाले, “आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर दोघांनी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> कल्याण लोकसभा मतदारसंघावर हक्क कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
यावरूनच फडणवीसांना शरद पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का? असं प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी केलं ते पाठीत खंजीर खुपसणं होतं. पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलं.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT