Ram Mandir : फडणवीसांचा राऊतांना सणसणीत टोला, ‘मुर्खांना मी…’
तुमचं राम जन्मभूमीच्या आंदोलनात काहीच योगदान नाही. आता अशाप्रकारची विधान करून करोडो हिंदुंच्या श्रद्धेला दुखावण्याचे काम उद्धव ठाकरेंची सेना करते आहे, ते चुकीचे असल्याचे देखील फडणवीसांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis Reply Sanjay Raut, Ram Mandir Inaugration : भाजपा ‘मंदिर वही बनायेंगे’ असा नारा देते आहे, पण मुळ जागेपासून 3 किलोमीटर लांब दुर राम मंदिर उभारल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. राऊतांच्या या दाव्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे. ज्यांचे या आंदोलनात काहीच योगदान नाही, अशा लोकानी आरोप करून स्वत:च हसू करून घेऊ नये. तसेच मुर्खांना मी उत्तर देत नाही, असे प्रत्युत्तर देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. (devendra fadnavis reply sanjay raut on ram mandir inaugration visit mumbadevi temple thackeray group maharashtra politics)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस आज मुंबादेवीच्या दर्शनाला आले होते. यावेळी फडणवीसांनी मंदिर परिसराची साफसफाई केली. या साफसफाईनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांचे या आंदोलनात काहीच योगदान नाही, अशी लोक अशाप्रकारचे आरोप करून स्वत:च हसू करून घेतायत, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. तसेच तुम्ही कोट्यवधी हिंदुंचा अपमान करताय.त्यामुळे आता तरी उबाठाने अशाप्रकारे हिंदुचा अपमान करणे बंद करावे, असे आवाहन फडणवीसांनी यावेळी केले.
हे ही वाचा : Sharad Mohol चा एका झटक्यात ‘गेम’ करणारा विठ्ठल शेलार आहे तरी कोण?
दरम्यान संजय राऊतांच्या दाव्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मुर्खांना मी उत्तर देत नाही.अशाप्रकारे हिंदुंचा अपमान करणे सोडून द्या. तुमचं राम जन्मभूमीच्या आंदोलनात काहीच योगदान नाही. आता अशाप्रकारची विधान करून करोडो हिंदुंच्या श्रद्धेला दुखावण्याचे काम उद्धव ठाकरेंची सेना करते आहे, ते चुकीचे असल्याचे देखील फडणवीसांनी सांगितले आहे.
हे वाचलं का?
राऊत काय म्हणाले?
भाजपचा त्यावेळी नारा काय होता ‘मंदिर वही बनाएंगे’ जाऊन बघा मंदिर तिथे बनले आहे की नाही. जिथे मंदिर बनविण्याचे बोलले जात होते. तिथे राम मंदिर बनविले नाही. तेथून तीन किलोमीटर लांब मंदिर बनविले आहे. तिथे कुणीही राम मंदिर बनवू शकतो. आम्हाला त्यात भेद करायचा नाही. यावर आम्ही बोलणार नाही, भाजपाने यावर बोलायला हवे, असे संजय राऊत म्हणाले होते.
हे ही वाचा : Mla Disqualification : “…तर हा प्रसंग आला नसता”, नार्वेकरांचा संताप; ठाकरेंना सुनावलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT