राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा एकटे पडले का, कसं फिरलं संपूर्ण राजकारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

did ajit pawar stand alone in ncp how did the whole politics turn
did ajit pawar stand alone in ncp how did the whole politics turn
social share
google news

Ajit Pawar NCP: मुंबई: ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यातील भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केलेली. ही घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पवारांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्येच ठिय्या आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी शरद पवारांनी निर्णय घेण्याची विनंती केली. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये सुरु असलेल्या सगळ्या घटनेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) एकटेच शरद पवारांच्या निर्णयाचे समर्थन करत होते. एवढंच नाही तर भावूक झालेल्या कार्यकर्त्यांना खडसावून हा निर्णय योग्य असल्याचे पटवून देत होते. (did ajit pawar stand alone in ncp how did the whole politics turn)

ADVERTISEMENT

आता पवारांनी नेमलेल्या समितीने देखील पवारांनीच पक्षाचे अध्यक्ष राहावं असा ठराव एकमताने केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार एकटे पडले आहेत का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या विषयाला सुरुवात करताना आपण गेल्या काही काळात घडलेल्या घडामोडी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. या क्रोनोलॉजीकडे आपल्याला नीट पाहावं लागेल त्यातूनच आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

अजित पवारांच्या बंडाच्या बातम्या अन्…

या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली अजित पवारांच्या बंडाच्या बातम्यांमुळे. अजित पवार बंडाच्या तयारीत असून राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन ते भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. संजय राऊत यांनी देखील त्यांच्या ‘रोखठोक’च्या सदरामध्ये याबाबत सविस्तर लिहिलं होतं. त्याचबरोबर अजित पवारांनी याबाबत खुलासा करावा असं देखील त्या सदरामध्ये म्हटलं होतं. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा देखील असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

अखेर अजित पवारांनी पुढं येत या सगळ्या चर्चांवर खुलासा केला. आपण राष्ट्रवादीतच शेवटपर्यंत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांचा देखील त्यांनी इन्कार केला. या सगळ्या घडामोडीनंतर लगेचच अजित पवारांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्याला आता देखील मुख्यमंत्री होता येईल असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देखील अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण

ईडीच्या कारवायांमुळे राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जातंय. परंतु भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार तयार नसल्याचं समोर आलं होतं. आता दादांच्या बंडाच्या बातम्या शांत होत नाही तोच शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमामध्ये राजीनाम्याची घोषणा केली.

ADVERTISEMENT

अजित पवार एकटे पडले?

पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले. कार्यकर्त्यांनी पवारांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वच नेते हजर होते. पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली. जयंत पाटील तर बोलताना भावूक झाले होते. असं असताना अजित पवार एकटेच शरद पवारांच्या निर्णयाचे समर्थन करत होते. पवार हा निर्णय 1 मे रोजीच जाहीर करणार होते, परंतु मविआची वज्रमूठ सभा असल्याने हा निर्णय पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला असं अजित पवारांनी सांगितलं होतं. यातून अजित पवारांना शरद पवारांच्या निर्णयाबाबत पूर्वकल्पना होती असं दिसून आलं.

याच कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी बोलू दिलं नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंची नेमकी भूमिका समोर येऊ शकली नाही. सर्व नेते, कार्यकर्ते पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती करत असताना एकटे अजित पवार त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत होते.

हे ही वाचा>> Ajit Pawar: अजितदादा पुन्हा नाराज?, शरद पवारांच्या ऐतिहासिक घोषणेवेळी होते गैरहजर

आता राष्ट्रवादीच्या समितीने पवारांनीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष रहावे असा ठराव केला. हा ठराव एकमताने घेतला असल्याचे देखील जाहीर करण्यात आलं. त्यामुळे पवारांच्या निर्णयाचे समर्थन करणारे अजित पवार समितीच्या बैठकीमध्ये देखील एकटे पडल्याचे चित्र होते. जेव्हा समितीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी काय भूमिका मांडली असं जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आलं तेव्हा पवारांचा राजीनामा फेटाळण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.

आता शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे पक्षात या मुद्द्यावर तरी अजित पवार हे एकटे पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT