Uddhav Thackeray: ‘तुम्ही 400 पार कसे करता हेच बघतो…’, ठाकरेंनी मोदींना उघडउघड दिलं आव्हान!
उद्धव ठाकरेंनी राज्यातील अनेक भागाचा दौरा करत मतदारांशी संवाद साधत आहेत. रायगडमधून बोलताना त्यांनी भाजपच्या ईडी कारवाया, पक्षांतर, खोट्या आरोपांवरून निशाणा साधत तुम्ही आता लोकसभेत 400 कसे पार करता तेच पाहतो असं थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray: आगामी लोकसभा निवडणुका (lok sabha election 2024) डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्षांनी कंबर कसली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रायगड दौरा करत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. ‘माझा पक्ष चोरला, मग माझ्या माणसांच्या मागे का लागता ? तुम्ही 400 पार होणार आहात ना, व्हा ना मग, आता आम्ही तुम्ही 400 पार कसे होता तेच बघतो.’ असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. यावेळी ज्या ज्या लोकांनी पक्ष सोडला आहे, त्यांच्यावर निशाणा साधत किशोर पेडणेकर, रवींद्र वायकर आणि रोहित पवारांच्यावरील ईडी कारवाईवरूनही (ED Action) त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाचे उद्योग गुजरातला
रायगडमधून भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना त्यांनी खोके घेतलेले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राची नाही तर गुजरातची भरभराट करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी शिंदे सरकारवर केला. महत्वाचे सगळे उद्योग आता गुजरातला जात आहेत, तरीही हे खोके सरकार निवांत असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला.
हे ही वाचा >> मॉडेल Poonam Pandey चे निधन; समोर आले मृत्यूचे कारण!
तुमचं हिंदुत्व मानणार नाही
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना पक्ष चोरणारे, फोडणारं, हिंदूंमध्ये भेदभाव करणारे तुमचे हिंदुत्व आहे का? असा सवाल करत मी तुमच्या हुकूमशाहीला हिंदुत्व मानणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
ते पाप तुम्ही करू नका
भाजपच्या लोकशाहीमुळेच आता तुम्हाला आता हिम्मत दाखवावी लागणार असून त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अगदी अंधभक्तांनाही आवाहन करत त्यांनी सांगितले की, पुढील पिढ्या हुकूमशहांच्या हातात देण्याचे पाप तुम्ही करू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ईडी कारवाई माझ्याच माणसांवर
उद्धव ठाकरे यांनी ईडी कारवाईवरून किशोर पेडणेकर, रवींद्र वायकर आणि रोहित पवारांच्या ईडीच्या कारवाईवरून गंभीर टीका केली आहे. यांच्या कारवाईवरून त्यांनी प्रफुल्ल पटेलांची चौकशी करताना ते तुमच्याकडे आल्यानंतर त्यांच्या चौकशीचे नंतर काय झाले की फक्त माझ्याच माणसांच्या तुम्ही मागे का लागता असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.