India Alliance : ठाकरेंचा नितीश कुमारांना फोन, म्हणाले, भाई ऐसा कैसा चलेगा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Former Chief Minister Uddhav Thackeray call to JDU President Nitish Kumar for India Aghadi
Former Chief Minister Uddhav Thackeray call to JDU President Nitish Kumar for India Aghadi
social share
google news

India Alliance : आगामी काळातील म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) अजून 3 ते 4 महिने बाकी आहेत. मात्र इंडिया आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेले दिसूत येत नाही. विरोधकांची जी आघाडी करण्यात आली आहे, त्या आघाडीमध्ये सहभागी झालेले राजकीय पक्ष आपापली महत्त्वाकांक्षा बरोबर घेऊनच आले आहेत. त्यामुळेच आघाडीत बिघाडी होत असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या महत्त्वांकाक्षेमुळेच इंडिया आघाडातील जागांबाबत कमी दिवस राहिलेले असतानाही अजून कोणताही निर्णय झाला नाही.

ADVERTISEMENT

इंडिया आघाडी एकसंध

बिहारच्या राजकारणाचा विचार केला तर बिहारसारख्या राज्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मकर संक्रांतीनंतर येथे राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांची चाचपणी करून ध्येय धोरणं ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजकीय गणितं चालू असतानाच ठाकरे गटाच्या शिवसेनेने मात्र जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली आहे. त्यांची चर्चा झाल्याने इंडिया आघाडी एकसंध ठेवण्याची जबाबदारी आता या दोन नेत्यांवर असल्याचेच सांगण्यात येत आहे.

कोणतीच रॅली नाही

आगामी काळातील निवडणुकांवर सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनीही जोरदार तयारी केली आहे. इंडिया आघाडीसाठी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना फोन लावला त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या दृष्टीने अजून आम्ही काहीच केले नाही. अजून एकही रॅली घेण्यात आली नाही व अजून निमंत्रकही ठरला नसल्याचे सांगत इंडिया आघाडीसाठी ‘भाई ऐसे कैसे चलेगा? असा सवालच त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मॉडेल दिव्याच्या हत्येची ‘ती’ शेवटची रात्र, पोलिसांनी सगळा घटनाक्रमच दाखवला

निवडणुका जाहीर होणार

उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही तुमच्या राज्यातील तसे सांगितले तरी 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या कार्यक्रमानंतरच आता निवडणुका जाहीर होतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता आमच्याकडे वेळ कुठे आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

काँग्रेसच्या हालचाली नाहीत

उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना सांगितले की, आता आम्हालाच पुढं जाऊन काही तरी केले पाहिजे. कारण काँग्रेसकडून जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता, त्यांनी जो पुढाकार घ्यायला पाहिजे होता तो त्यांच्याकडून होताना दिसून येत नाही. त्यावर नितीश कुमार यांनी सांगितले की, आपण त्यासाठी तयार आहे. मात्र त्यानंतर व्हर्च्युअल मिटींग झाली त्यावेळी निमंत्रक म्हणून नितीश कुमार यांची चर्चा व्हावी असं त्यांना वाटत होते. मात्र जरी नितीश कुमार निमंत्रक झाले तरी, त्यांना आता वेळ कुठं आहे. देशाचा दौरा ते करु शकतील का? असे सवाल उपस्थित करून आघाडीचे वातावरण निर्माण करण्यासाठी तरी त्याची गरज होती. मात्र अजूनपर्यंत एकही रॅली निघाली नाही.

ADVERTISEMENT

आघाडीला ‘काँग्रेस’चे  इंजिन

इंडिया आघाडीची एकता दाखवण्यासाठीही विरोधकांमध्ये कुठेच एकवाक्यता दिसून येत नाही. त्यामुळे आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून तरी ज्या प्रकारे पुढाकार घेण्याचा प्रकार होणं अपेक्षित होतं ते होताना अजिबात दिसत नाही. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस म्हणजे या आघाडीचे एक इंजिन असल्याचेही म्हटले जाते आहे. त्यामुळे या इंजिनचा चालक हा राहुल गांधी असल्याचे सांगितले जाते आहे. त्यांनीच आता एक्सलेटर दाबणे आणि गिअर बदलणे एवढंच त्यांना करायचे आहे. मात्र काँग्रेस जागावाटपाच्या चर्चेवर पुढेच येत नसल्याचेही मत व्यक्त केले जात असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. सध्या निवडणुकीसाठी लागणारा वेळही कमी आहे. त्यामुळे 2024 मध्ये भाजपला जोरदार टक्कर द्यायची असेल तर मात्र इंडिया आघाडीला कोणताही निर्णय जलद गतीनेच घ्यावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> हाजी मलंग दर्गा की मंदिर?, राजकारण का तापले? नेमका त्याचा इतिहास काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT