जयंत पाटलांना भाजपकडून ऑफर? भाजप नेता संजय राऊतांवर संतापला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Political news : keshav upadhye, leader of bjp slams MP sanjay Raut after he claim that bjp gave offer to jayant patil.
Maharashtra Political news : keshav upadhye, leader of bjp slams MP sanjay Raut after he claim that bjp gave offer to jayant patil.
social share
google news

Political News Of Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मागे सध्या ईडीचा ससेमिरा लागलेला दिसत आहे. ईडीने त्यांची 9 तास चौकशीही केली. या चौकशीबद्दल सामना अग्रलेखात भाष्य करताना एक दावा केला गेला की, जयंत पाटील यांच्यावर भाजपत येण्यासाठी दबाव आहे. याच विधानावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. केशव उपाध्ये यांनी भाकरी आणि चाकरीचा उल्लेख करत संजय राऊत यांना लक्ष्य केलं. (Bjp Leader Keshav Upadhye hits out at Sanjay Raut)

ADVERTISEMENT

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना काय उत्तर दिलं, त्याआधी सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं, ते आधी बघूयात. “पाटला-पाटलांतला फरक”, या मथळ्याखाली सामना अग्रलेख लिहिण्यात आला. त्यातून ईडीच्या चौकशीबद्दल भाष्य करण्यात आलं.

भाजपकडून जयंत पाटलांना ऑफर? सामनात काय म्हटलेलं?

अग्रलेखात म्हटलेलं आहे की, “जयंत पाटील यांनीही भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केशव उपाध्ये यांचं संजय राऊतांना उत्तर

अग्रलेखातूनच अशा प्रकारचं भाष्य करण्यात आल्यानं भाजपकडूनही याला उत्तर देण्यात आलं. केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलं की, “भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची… हा संजय राऊत यांचा सध्याचा फॅार्म्युला आहे. सामनाची अवस्था संजय राऊतांनी त्यांच्या वक्यव्यांसारखीच म्हणजेच फेक न्यूज फॅक्टरीसारखी करुन ठेवली आहे.”

हेही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

उपाध्ये यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, “तारतम्य सोडून काहीही बोलायचं हा संजय राऊतांचा हल्लीचा छंद आहे, तसे लिखाणही सामनामधूम होत आहे. भारतीय जनता पार्टीने जयंत पाटलांना कोणताही प्रस्ताव देण्याचा काही संबंधही नाही”, असं सांगत त्यांनी भाजपकडून ऑफर असल्याची चर्चा फेटाळून लावली.

ADVERTISEMENT

“केवळ चौकशीच्या मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी हा खोटा दावा केला जातोय. संजय राऊत आधी पवार साहेबांचे प्रवक्ते होते, ते आता जयंत पाटलांनाही डिफेंड करताहेत. याचाच अर्थ आता राऊत राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते झाले आहेत”, असं उत्तर देत केशव उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीबद्दल ‘सामना’तून यापूर्वीही झालेत गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींबद्दल सामनातून भाष्य करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा पद्धतीचे गौप्यस्फोट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक आहेत, असं संजय राऊत यांनीच त्यांच्या रोखठोक सदरात लिहिलं होतं. शरद पवारांनीच हे सांगितल्याचा दावा त्यांनी केला होता.

हेही वाचा >> जयंत पाटलांचं कौतुक, ठाकरेंनी सगळा इतिहासच काढला! ‘सामना’तून पुन्हा ‘वार’

त्यानंतर शरद पवारांचं राजीनामा नाट्य घडलं. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतरही सामना अग्रलेखातून भाजपसोबत जाण्यास इच्छुक असलेल्या आमदारांबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. कुंपणावर असलेल्या या नेत्यांना संदेश देण्यासाठी पवारांनी हे केल्याचं अग्रलेखात म्हटलेलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT