Manoj Jarange: CM शिंदे एकटे पडले, लढले अन् जिंकले… जरांगेंसोबतच्या ‘त्या’ फोन कॉलची Inside Story
Maratha Reservation and CM Eknath Shinde: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी आणि मनोज जरांगेनी उपोषण सोडावं यासाठी एकनाथ शिंदेंनी एकट्याने राजकीय पातळीवर लडा दिल्याची जोरदार चर्चा आहे. वाचा याचीच Inside Story
ADVERTISEMENT
Maratha Reservation: मुंबई: महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून पेटलेल्या राजकारणाला तूर्तास तरी पडदा पडला आहे. कारण शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange-Patil) त्यांचं आमरण उपोषण मागे घेतलं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिष्टाई फळाला आल्याचं चित्र सध्या तरी पाहा आहे. (how did only cm eknath shinde unite to solve the problem of maratha reservation movement and to breaks manoj jaranges fast)
ADVERTISEMENT
कारण दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याने चिघळलेले आंदोलन निवळण्याची जबाबदार एकट्या मुख्यमंत्र्यांवर येऊन पडली होती. मात्र सर्वपक्षीयांमध्ये मतैक्य घडवत आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फ्रंट फुटवर खेळण्याशिवाय पर्याय नव्हता.
पण नेमका हा तिढा सोडवण्यासाठी पडद्यामागे काय घडामोडी घडल्या याची ही आहे Inside Story
मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आमरण उपोषण नवव्या दिवशी सोडले. मात्र या नऊ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी बॅक डोअर चॅनेल्स सुरु करून जरांगे यांची समजूत काढण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला. सर्वप्रथम मराठवाड्यातील कुणबी यांना जातप्रमाण पत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी होती. मात्र नंतर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली .
हे वाचलं का?
अशा परिस्थितीत ओबीसीकडून या मागणीला विरोध होणार याची पूर्ण जाणीव मुख्यमंत्र्यांसकट सत्ताधाऱ्यांना होती. त्यामुळे हिंसक झालेल्या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी अणि सरसकट आरक्षण देणे शक्य नाही हे स्पष्ट करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. सोबतच आमदार बच्चू कडू यांच्यामार्फत जरांगे पाटलांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद सुरु ठेवण्याचा निरोप पाठवण्यात आला
हे ही वाचा >> Eknath Shinde: ‘जरांगेंची सरसकट आरक्षणाची मागणी नाही’, CM शिंदेंच्या विधानाने मोठा संभ्रम
तर दुसरीकडे सर्वपक्षीय ठराव करून हिंसा थांबवण्यासाठी आणि सरसकट आरक्षण देता येणार नाही, म्हणजेच कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी सर्वपक्षीय सहमती घेण्यात आली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री शिंदे यांचा जरांगेंना फोन.. 24 मिनिटांत घडलं तरी काय?
याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांची जरांगे पाटलांशी फोनवर संवाद सुरूच ठेवला. उपोषण सोडण्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी 24 मिनिटं जरांगे पाटलांशी चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना कायदेशीर बाबी समजून न घेतल्यास आरक्षण पुन्हा कसं रद्द होईल आणि आंदोलन व्यर्थ ठरेल हे सांगितले.
ADVERTISEMENT
त्यानंतर कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठी मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष रिटायर्ड जस्टीस गायकवाड आणि शुक्रे यांना चर्चेसाठी पाठवत असल्याचं सांगितले. याव्यतिरिक्त आतापर्यंत सापडलेल्या साडे तेरा हजार कुणबी नोंदींच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणाचं श्रेय पूर्णपणे तुम्हीच घ्या अशीही ग्वाही जरांगे पाटील यांना दिली.
हे ही वाचा >> Maratha Reservation: मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं अन् CM शिंदे म्हणाले, ‘आम्ही कोणाचीही…’
तसेच काही दिवसात दिवाळी आहे. आंदोलनामळे अवघ्या राज्यात काळी दिवाळी साजरी होईल आणि मराठा आरक्षणाच्या संघर्षाला गालबोट लागेल अशी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर सरसकट मराठा आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन शिवाय पर्याय नाही, अन्यथा सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल अशी वस्तुस्थिती मांडण्यात आली.
यानंतर जरांगे पाटलांनी चर्चेची दारं उघडी केली आणि कायदेशीर सल्लागार तसेच मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर काल अखेर दोन महिन्यांच्या मुदत वाढीच्या अटी शर्तीवर उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT