LPG Price : सत्ताधाऱ्यांना INDIA ने घाम फोडला, दोन बैठकीतच गॅस स्वस्त केले…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

LPG Gas price India bjp criticize narendra modi
LPG Gas price India bjp criticize narendra modi
social share
google news

India on LPG Price : केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारने मंगळवारी महागाईपासून थोडासा दिलासा देत स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर बोलताा ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी म्हटले आहे की, देशात विरोधी पक्षाच्या आघाडीची स्थापना I.N.D.I.A. होताच केंद्र सरकार हादरले आहे. I.N.D.I.A. च्या दोन बैठकीतच हादरल्याने स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करण्याचा निर्णय घ्यव्या लागल्या आहेत.

ADVERTISEMENT

ममतांचा ट्विटवरून हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून हल्लाबोल करताना त्यांनी सांगितले की, आजपर्यंत मागील दोन महिन्यात इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीच्या दोनच बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या दोन बैठकी झाल्यामुळेच केंद्राने एलपीजी गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विरोधकांच्या इंडियाचा ही खरा ताकद असल्याचा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ही सूट नव्हे

पश्चिम बंगालमधून केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालच्या काँग्रेसच्या नेत्या सौम्या आईच रॉय यांनी सांगितले की, या सरकारकडून लूटमार केली जात आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य माणसांवरच डल्ला मारण्याचं काम सुरु केलं आहे. तर सीपीएमच्या रबिन देव यांनी सिलिंडरवरून हल्लाबोल करताना म्हणाले की, 400 रुपयांना मिळणार गॅस आता 1100 रुपयांचा झाला आहे. त्यामुळे गॅसच्या किंमतीत दोनशे रुपये कमी झाले म्हणजे खूप मोठी सूट मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही असा टोला त्यांनी केंद्राला लगावला आहे. भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच हा निर्णय घेतला गेला आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

हे ही वाचा >>Dilip walase Patil : ‘…पवार साहेब तर आमच्या’, अजितदादांबरोबर गेलेल्या ‘त्या’ नेत्याची भावनिक साद

जनता सरकारच्या बाजूने

बंगालमधील भाजपचा नेता शमिक भट्टाचार्य यांनी भाजपची बाजू उचलून धरताना सांगितले की, केंद्र सरकारने ज्या प्रकारे कोरोनाच्या काळात देशाची अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केले आहे. त्यामुळे भारताची जागतिक पातळीवर वाहवा झाली होती. त्यामुळे केंद्र सरकार जनतेसाठी काम करत आहे नागरिक केंद्र सरकारच्या बाजूने असल्याचेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

…म्हणून सूट दिली

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीत एलपीजी सिलिंडरचे दर 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता उज्ज्वल योजनेच्या लाभार्थिंना चारशे रुपयांपर्यंत गॅस सब्सिडी मिळणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> INDIA@100: नवीन युगाचे इंधन, भविष्याचं इंधन…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT