PM modi : 2024 मध्ये भाजप हॅटट्रिक करणार? मोदी म्हणाले, “जनतेला मिली-जुली सरकार…”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

NARENDRA MODI interview with India Today on lok sabha election 2024
NARENDRA MODI interview with India Today on lok sabha election 2024
social share
google news

PM Narendra Modi interview with India Today, Lok Sabha Election 2024 : लोकसभेची निवडणूक काह महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रीय पक्षांकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. या सगळ्यात एक प्रश्न सातत्याने समोर येतोय, तो म्हणजे भाजप पुन्हा सत्तेत येणार की, इंडिया आघाडी सत्तेत येणार? 2014 पासून सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. पण, भाजप हॅटट्रिक करू शकेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबद्दल काय वाटतं, याचं अखेर मिळालं आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीच यावर भाष्य केलं आहे. (Prime Minister Narendra Modi Predictions About Lok Sabha Election 2024 Result)

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया टुडे’ला विशेष मुलाखत दिली. एडिटर इन चीफ अरुण पुरी, उपाध्यक्षा कली पुरी आणि ग्रुप एडिटोरिअर डायरेक्टर राज चेंगप्पा यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना 2024 मध्ये भाजप हॅटट्रिक करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. मोदींनी काय दिलं उत्तर वाचा…

हेही वाचा >> ठाकरेंकडे उमेदवारच कुठेय? काँग्रेस नेत्याचा पवारांनाही सल्ला

प्रश्न : तुम्हाला 2024 मध्ये हॅट्ट्रिक करण्याचा विश्वास आहे का? या लोकसभा निवडणुकीचे निकाल कोणते मोठे मुद्दे ठरवतील?

पंतप्रधान मोदी – 2024 बद्दल सांगायचं तर, हा माझ्या आत्मविश्वासाचा प्रश्न नाही. माझे सर्वस्व जनतेच्या सेवेसाठी अर्पण करणे, एवढेच माझ्या हातात आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेने हे करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज जनतेला मिली-जुली सरकारची (अनेक पक्षांची आघाडी असलेलं सरकार) गरज नाही, याबद्दल लोकांमध्ये, तज्ञांमध्ये, लोकांवर प्रभाव असणाऱ्यांमध्ये आणि मीडियातील मित्रांमध्येही एकमत आहे. मिली-जुली सरकारांमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपण 30 वर्षे गमावली आहेत. मिली-जुली सरकारच्या काळात कारभाराचा अभाव होता, तुष्टीकरणाचे राजकारण, भ्रष्टाचार हे जनतेने पाहिले आहे. यामुळे लोकांमधील आशावाद आणि आत्मविश्वास कमी झाला आणि जगामध्ये भारताची प्रतिमा खराब झाली. त्यामुळे साहजिकच लोकांची पसंती भाजपला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “शिंदे गट 100 टक्के भाजपमध्ये विलीन होणार”

प्रश्न : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘मोदीची गॅरंटी’ काय आहे?

पंतप्रधान मोदी – माझ्यासाठी, हमी हा केवळ शब्द किंवा निवडणुकीतील आश्वासने नसून, माझ्या अनेक दशकांच्या मेहनतीचे फळ आहे. ही समाजाप्रती संवेदनशीलतेची अभिव्यक्ती आहे. जेव्हा मी ‘हमी’विषयी बोलतो, तेव्हा मी स्वतःला त्याच्याशी बांधून घेतो. ही गोष्ट मला झोपू देत नाही, मला अधिक मेहनत करण्यास प्रोत्साहित करते, देशाच्या लोकांसाठी माझे सर्वस्व देण्यास प्रोत्साहित करते. त्यामुळे गॅरंटी या शब्दाचा अर्थ शब्दकोषात शोधू नका.

प्रश्न : मग गॅरंटी या शब्दाची तुमची व्याख्या काय आहे?

पंतप्रधान मोदी – गरिबीचे जीवन अनुभवलेल्या व्यक्तीलाच हे समजते की गरीब व्यक्तीला आयुष्यात पुढे नेणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचा विश्वास, त्यांची आशा. गरिबांचा हा विश्वासच मला पुढे चालवत आहे. मोदी आपले सर्वस्व पणाला लावतील पण आपल्या गरीब बंधू-भगिनींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत. मोदींची हमी हा निवडणुका जिंकण्यासाठी बनवलेला फॉर्म्युला नाही, मोदींची हमी म्हणजे गरिबांचा विश्वास आहे. आज देशातील प्रत्येक गरिबाला माहित आहे की, मोदी आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाहीत. भूतकाळातील राजकीय पक्षांनी त्यांचा विश्वास कसा तोडला, याची जाणीव आज प्रत्येक गरीबाला आहे. पण मोदींच्या हमीभावावर विश्वास ठेवता येईल, हेही त्यांना माहीत आहे. गरिबांचा हा विश्वास मला उर्जा देखील देतो. जरी मी पूर्णपणे थकवलो किंवा माझ्या मर्यादा ओलांडल्या, तरी मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT