Jalna लाठीहल्ला, ‘गृहमंत्र्याच्या मनातील भावना हीच पोलिसांची कृती’ शरद पवारांचा आरोप
Sharad Pawar on Jalna lathicharge: काही घटकांच्याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांचा मनात जी काही भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ती कृती व्यक्त झाल्याचं चित्र आपण जालन्यात सुद्धा आज पाहिलं. असा आरोप शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar on Jalna lathicharge: मुंबई: जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चाकडून (Maratha Akrosh Morcha) मागील चार दिवसांपासून उपोषण सुरू होतं. जिथे आज अचानक मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी जमावावर तुफान हल्ला चढवला. यामध्ये पोलिसांनी अनेक तरुण हे गंभीररित्या जखमी झाले आहे. ज्यानंतर या सगळ्या प्रकाराला हिंसक वळण लागलं आहे. याचबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. (jalna lathicharge on maratha protesters feelings in home minister mind are the actions of police sharad pawar accuses devendra fadnavis)
ADVERTISEMENT
‘काही घटकांच्याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांचा मनात जी काही भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ती कृती व्यक्त झाल्याचं चित्र आपण जालन्यात सुद्धा आज पाहिलं. त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा? पोलिसांना वरनं जसे आदेश दिले तशी त्यांनी कामगिरी केली. पोलीस आणि तरुण यांच्यात कारण नसताना एक प्रकारची कटुता वाढली.’ असं म्हणत शरद पवार यांनी या सगळ्याला प्रकाराला देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
‘गृहमंत्र्यांचा मनात जी काही भावना असेल ती पोलिसांच्या कृतीतून…’, पवारांचा थेट फडणवीसांवर आरोप
‘मला जालन्यावरुन एक-दोन लोकांचे फोन आले. तिथे काय घडलंय ते सांगितलंय. तिथे मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी हे उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला. त्या चर्चेमध्ये शांततेने सगळं चाललं होतं. पण चर्चा झाल्यानंतर पोलीस बळाचा वापर करून त्यांना तिथून हुसकवून लावण्यासाठी प्रयत्न केला गेला.’
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Jalna Maratha Protestors: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा तुफान लाठीहल्ला, नेमकं काय घडलं?
‘त्यात त्या तरुणांवर प्रखर लाठीहल्ला केला. खरं तर म्हटलं एकदा तुम्ही चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काही आवश्यकता नव्हती. पण हल्ली विशेषत: अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्यासंबंधीचे कुठलेही प्रश्न असले आणि अशा प्रश्नांची उत्तंर नाही मिळाली तर ते रस्त्यावर आले तर बळाचा वापर यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी.’
‘काही घटकांच्याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांचा मनात जी काही भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. ती कृती व्यक्त झाल्याचं चित्र आपण जालन्यात सुद्धा आज पाहिलं. त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा? पोलिसांना वरनं जसे आदेश दिले तशी त्यांनी कामगिरी केली. पोलीस आणि तरुण यांच्यात कारण नसताना एक प्रकारची कटुता वाढली.’
‘याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारला, राज्य सरकारमध्ये गृह खात्याची जबाबदारी घेणाऱ्या प्रशासकाची आहे. त्यामुळे हे घडतंय.. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय.’
ADVERTISEMENT
‘जर हे तुम्ही थांबवलं नाही तर मला त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना धीर द्यावा लागेल. तसेच त्या लोकांची सुटका करण्यासाठी पावलं टाकावी लागतील. मला स्थानिक लोकांनी फोनवर सांगितलं की, फौजफाटा आला आणि त्यांनी आमच्याशी चर्चा केली.. त्यानंतर हा हल्ला केला. हा अमानुष हल्ला आहे.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Parliament special session: ‘सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीतच राहा…’ PM मोदी घेणार प्रचंड मोठा निर्णय?
‘जालन्यात मराठा आरक्षणासलाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन चालू होते. हे आंदोलन चालू असतानाच जरांगे-पाटील यांची प्रकृती बिघडली. याचवेळी पोलिसांबरोबर चर्चा चालू असतानाच अचानक आंदोलनातील नागरिकांवर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज चालू केला. या लाठीचार्जमध्ये अनेक पुरुष आणि महिला जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.’ असं म्हणत शरद पवार यांनी या प्रकरणी राज्य सरकार बरीच टीका केली आहे.
ADVERTISEMENT