Chhagan Bhujbal: तेलगी प्रकरणात चार्जशीटमधील नाव खोडणारा अदृश्य हात कुणाचा?, जितेंद्र आव्हाडांच सूचक ट्वीट
अजित पवार गटाची रविवारी बीडमध्ये सभा पार पडली. या सभेतून बोलताना मंत्री छगन भूजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करून प्रश्नांची सरबत्ती केली होती.
ADVERTISEMENT
अजित पवार गटाची रविवारी बीडमध्ये सभा पार पडली. या सभेतून बोलताना मंत्री छगन भूजबळ (chhagan bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करून प्रश्नांची सरबत्ती केली होती. यामधील तेलगी प्रकरणाची खूप चर्चा रंगली आहे. माझ्यावर तेलगी घोटाळ्यात आरोप झाल्यावर तुम्ही माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतलात. पण 1992-93 मध्ये तुमच्यावर (शरद पवारांवर) गंभीर आरोप झाले,तेव्हा तुम्हाला कोणीही राजीनामा मागितला नाही. मग राजीनामा का घेतला? असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना केला होता. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून सूचक विधान केले आहे. (jitendra awhad tweet on telgi chargesheet chhagan bhujbal attack sharad pawar beed meeting)
जितेद्र आव्हाडांचे ट्वीट
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणावर ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी म्हटलं, तेलगी प्रकरणाचा तपास CBI ने केला. CBI ने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी अतिरिक्त महाधिवक्ता अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली होती,असे आव्हाडांनी सुरुवातीला म्हटलं.
हे ही वाचा : Praful Patel: NCP चा निकाल ‘या’ दिवशी खरंच लागणार?, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं. तेव्हा मी त्यांना शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते, असे आव्हाडांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान शरद पवार आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर दोन महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली. आणि त्यानंतर ज्या ओरिजनल चार्जशीट जी नावे होती ती सगळी वगळण्यात आली होती. एक अदृश्य हात सगळी नाव खोडून गेला …. तो अदृश्य हात कुणाचा? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. पण यामधून तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे तो काढून घ्या. समझने वाले को इशारा काफी होता है !, असे सूचक ट्वीट आव्हाडांनी केले आहे.
तेलगी प्रकरणाचा तपास CBI ने केला. CBI ने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणी साठी Additional Advocate General अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली. त्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 28, 2023
ADVERTISEMENT
छगन भुजबळ काय म्हणाले?
माझ्यावर तेलगी घोटाळ्यात आरोप झाल्यावर तुम्ही माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतलात. हे निराधार आरोप असूनही मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. पण 1992-93 मध्ये तुमच्यावर (शरद पवारांवर) गंभीर आरोप झाले,तेव्हा तुम्हाला कोणीही राजीनामा मागितला नाही. मग राजीनामा का घेतला? असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना विचारला होता. छगन भुजबळाच्या या विधानाला जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Chandrayaan 3: प्रज्ञान रोव्हरच्या वाटेवर भला मोठा खड्डा, कसा मार्ग काढणार? इस्त्रोने दिली माहिती
ADVERTISEMENT